रामदेव बाबांकडून अखेर ‘ते’ वक्तव्य मागे, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!
IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.
मुंबई : कोरोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरु रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर Indian Medical Association अर्थात IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक पत्र लिहून आपण ते वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलंय. (Controversial statement about allopathy back from Yogaguru Ramdev Baba)
रामदेब बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडतोय. त्यामुळे रामदेव बाबा यांचं ‘पतंजली’ सध्या ट्वीटरवर ट्रेन्ड करत आहे. सोशल मीडिया यूजर्सनी रामदेव बाबा यांच्यावर अनेक मजेदार मिम्स बनवले आहेत. हे मिम्स पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहत नाही. एका यूजरने म्हटलंय की, रामदेव बाबा यांचं ज्ञान पाहून असं वाटतं की ते विश्वगुरु बनले आहेत. तर एकाने म्हटलंय की, जेव्हा रामदेव बाबा आजारी पडतात तेव्हा ते स्वत: एलोपॅथी उपचार घेतात.
Baba Ramdev ko doctor se p@ng@ bhari padta nazar aa rha h ??? pic.twitter.com/PtefmuaIhR
— Dr. Khan Sahab ? (@roflkhan00) May 24, 2021
Patanjali ppE kit??? pic.twitter.com/lJ6tYAgyIv
— Zara Khan (@ZaraKha66605880) May 24, 2021
Match found. Both are mentally affected persons.#BabaRamdev https://t.co/R8knYBl7ON pic.twitter.com/TzhRkkikYh
— Social Animal (@socialadjur) May 24, 2021
नेमकं प्रकरण काय?
कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतली होती. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी IMAने केली होती. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईची मागणी
रामदेव बाबा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या IMA ने थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच दाद मागितली होती. “केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी एक तर हा आरोप स्वीकार करावा आणि आधुनिक उपचार पद्धती बंद करावी. नाहीतर मग रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करुन साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी IMA ने केली होती. देशात कोरोना महामारीचा सामना करतोय. आधुनिक उपचार पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या 1 हजार 200 एलोपॅथी डॉक्टरांनी बलिदान दिलंय, असंही IMA ने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं होतं.
D₹ + $cientist Ramdev doesn’t want allopathy to be used in curing Corona patients ? pic.twitter.com/7l2NtKih5p
— Baba MaChuvera ( Nigeria wale ) ↗️ (@indian_armada) May 22, 2021
संबंधित बातम्या :
आधी म्हणाले अॅलोपॅथीने लाखो लोकांचा जीव घेतला, देशभरातून टीकेनंतर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे
सरकारच्या Fake News तपासणी करणाऱ्या विभागालाही सोडलं नाही, PIB ची फसवी वेबसाईटमागे कोण?
Controversial statement about allopathy back from Yogaguru Ramdev Baba