IMA ही इंग्रजांच्या काळातील NGO, त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही- रामदेव बाबा

एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे? असा सवाल रामदेव बाबा यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत केलाय.

IMA ही इंग्रजांच्या काळातील NGO, त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही- रामदेव बाबा
योगगुरु रामदेव बाबा
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:41 PM

नवी दिल्ली : एलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. याप्रकरणात IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत रामदेवबाबांवर कारवाईची मागणी केली होती. तसंच 1 जून रोजी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने रामदेव बाबा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केलीय. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांची टीव्ही 9 भारतवर्षवर मुलाखत पार पडली. (Ramdev Baba’s interview on TV9 Bharatvarsha)

एलोपॅथी उपचार पद्धतीवर एका व्हॉट्सअॅप मेसेजआधारे केलेल्या वक्तव्याबाबत आपण माफी मागितली आहे. तसंच लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे? असा सवाल रामदेव बाबा यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत केलाय. त्याचबरोबर ऑक्सिजन मिळाल्यानंतरही एलोपॅथीची औषधं खाणाऱ्या लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपण एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो. पण, गुगल केलं तर आयुर्वेदाला स्टूपिड सायन्स म्हटलं जातं. आपण कुणाचा द्वेष करत नाही, पण कुणी सनातन धर्म आणि योगावर अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही रामदेव बाबा यांनी दिलाय.

‘आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले’

रामदेव बाबा म्हणाले की, IMA हा एलोपॅथीचा ठेकेदार नाही. ही एक NGO आहे जी इंग्रजांच्या काळात बनली. त्यामुळे त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर हे कधीही विसरुन चालणार नाही की एलोपॅथीची निर्मिती करणारे महर्षी सुश्रुत होते. आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कुणीही ही बाब नाकारु शकत नाही, असंही रामदेव बाबा म्हणाले.

एलोपॅथी डॉक्टरांसोबत चर्चेला तयार

टीव्ही 9 भारतवर्षला मुलाखत देताना रामदेव बाबा म्हणाले की, आपल्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे लोक आपल्यावर जळतात. त्यांना भीती आहे की एक गरीब घरातला मुलगा अनेक मोठ्या कंपना बंद पाडेल. या सगळ्यांच्या पाठीशी अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. पण आपल्याकडे फक्त धर्म आणि सत्याची ताकद आहे. इतकंच नाही तर रामदेव बाबा यांनी एलोपॅथी डॉक्टरांना आव्हान देत, कुणी आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असेल तर आपणही तयार आहोत. आपण एलोपॅथीची प्रॅक्टिस करत नाही पण एखाद्या डॉक्टरपेक्षा त्याबाब अधिक जाणतो, असा दावाही रामदेव बाबा यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

Ramdev Vs IMA: रामदेव म्हणतात, IMA अधिकाऱ्यांचे संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी !

रामदेव बाबांकडून अखेर ‘ते’ वक्तव्य मागे, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

Ramdev Baba’s interview on TV9 Bharatvarsha

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.