योगगुरु रामदेव बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करा, IMA आक्रमक
कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतलीय. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी IMAने केली आहे. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (IMA demands File a case against yoga guru Ramdev Baba for disbelief in allopathy)
रामदेव बाबा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या IMA ने थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच दाद मागितली आहे. “केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी एक तर हा आरोप स्वीकार करावा आणि आधुनिक उपचार पद्धती बंद करावी. नाहीतर मग रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करुन साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी IMA ने केली आहे. देशत कोरोना महामारीचा सामना करतोय. आधुनिक उपचार पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या 1 हजार 200 एलोपॅथी डॉक्टरांनी बलिदान दिलंय, असंही IMA ने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलंय.
IMA issues press release over a video on social media where Yog Guru Ramdev allegedly speaks against Allopathy. IMA demands that the “Union Health Minister either accept accusation & dissolve modern medical facility or prosecute him and book him under Epidemic Diseases Act.” pic.twitter.com/FnqUefGjQA
— ANI (@ANI) May 22, 2021
रामदेव बाबांचा व्हिडीओ
एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रामदेव बाबांनी एलोपॅथी ही एक मूर्ख आणि लंगडे विज्ञान असल्याचं सांगत त्याबाबत अविश्वास दाखवलाय. सर्वात आधी हायड्रोक्लोरिक्विन फेल ठरले. त्यानंतर प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर आज लाखो लोकांचा मृत्यू हा एलोपॅथीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. आज जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण एलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलंय. दरम्यान, आपण मॉडर्न मेडिकल सायन्सचा विरोध करत नाहीत. पण सध्या होत असलेल्या प्रयोगांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय.
D₹ + $cientist Ramdev doesn’t want allopathy to be used in curing Corona patients ? pic.twitter.com/7l2NtKih5p
— Baba MaChuvera ( Nigeria wale ) ↗️ (@indian_armada) May 22, 2021
संबंधित बातम्या :
ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा, औषधांचा साठाही उपलब्ध करा; सोनिया गांधींचं मोदींना पत्रं
VIDEO: डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक; लेकरांची काळजी घेण्याचाही सल्ला
IMA demands File a case against yoga guru Ramdev Baba for disbelief in allopathy