रतन टाटा यांची लक्षद्वीपला मोठी भेट, मालदीव वादानंतर महत्वाचा निर्णय

| Updated on: Jan 10, 2024 | 8:44 AM

Boycott Maldives Trend: भारत आणि मालदीवमधील वादात लक्षद्वीप चर्चेत आले आहे. या वादात सर्वच भारतीय सहभागी झाले असून सोशल मडियावर Boycott Maldives Trend सुरु झाला आहे. बॉलीवूडने लक्षद्वीपच्या पर्यटनासाठी मोहीम सुरु केली आहे. त्याचवेळी उद्योगपती रतन टाटा यांनी लक्षद्वीपसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रतन टाटा यांची लक्षद्वीपला मोठी भेट, मालदीव वादानंतर महत्वाचा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली, दि. 10 जानेवारी 2024 | मालदीवमधील निवडणुकीनंतर त्या देशात सरकार बदलले. नवीन सरकारने चीनशी जवळीक साधली आहे. मालदीपला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटनीती आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला. तेथील निसर्गरम्य आणि सुंदरतेचे फोटो शेअर केले. पर्यंटकांना लक्षद्वीप येण्याचे आवाहन केले. त्यानंतर लक्षद्वीपकडे जगाचे लक्ष वेधले गेले. गुगलमध्ये लक्षद्वीप सर्च करण्याचे प्रमाण ३४०० टक्के वाढले. यामुळे मालदीवमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य केले. अर्थात भारताने यासंदर्भात मालदीव सरकारकडे आक्षेप नोंदवताच या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर बायकोट मालदीव ट्रेंड सुरु झाला आहे. आता उद्योगपती रतन टाटा यांनी लक्षद्वीपसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे लक्षद्वीपच्या पर्यटनास वाव मिळणार आहे.

लक्षद्वीपमधील सर्वात मोठी अडचण दूर

रतन टाटा यांनी लक्षद्वीपमधील सर्वात मोठी अडचण दूर केली आहे. जगातील सर्वात सुंदर क्षेत्र असलेल्या लक्षद्वीपकडे काही अडचणींमुळे पर्यटक येऊ शकत नव्हते. लक्षद्वीप पर्यटन विभागाची पॉलीसी 2020 मध्ये आली होती. त्यात लक्षद्वीपकडे पर्यटक का येत नाही? त्यासंदर्भात काही कारण दिले होते. त्यात महत्वाचे कारण म्हणजे राहण्याची चांगली व्यवस्था नाही, हे होते. सध्या संपूर्ण लक्षद्वीपमध्ये फक्त 184 बेडची व्यवस्था आहे. यामुळे रतन टाटा यांनी लक्षद्वीपमध्ये इंडियन हॉटल्स कंपनीचे दोन बँण्डेड रिसोर्ट उघडण्याची घोषणा केली आहे. त्यांचे हे रिसोर्ट 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. या हॉटेलची निर्मिती IHCL करणार आहे. हे हॉटेल सुहेली आणि कदमत बेटावर उघडण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारकडून लक्षद्वीपच्या विकासाकडे लक्ष

मालदीवपेक्षा लक्षद्वीपचा समुद्र किनारा सुंदर दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर होत आहे. यामुळे हजारो भारतीयांनी मालदीममधील आपले बुकींग रद्द केले आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने लक्षद्वीपच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. IHCL चे एमडी आणि सीईओ पुनीत चटवाल यांनी सांगितले की, टाटा ग्रुपचे दोन जागतिक दर्जाचे रिसोर्ट जगभरातील पर्यटकांना लक्षद्वीपकडे आकर्षित करतील. 36 बेटांचा या समूहावर बंगाराम, अगत्ती, कदमथ, मिनिकॉय, कवरत्ती आणि सुहेली यासारखे अनेक पर्यटन स्थळ आहे.