आमच्या नद्यांमध्ये बेवारस प्रेतं फेकली नाहीत, अन् महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर म्हणता, राऊतांचे मोदींना उत्तर
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, कितीही प्रयत्न करा. खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमकावा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे.
नवी दिल्लीः महाराष्ट्राला सुप्रर स्पेडर कोरोना म्हणालात. मात्र, आमच्या नद्यांमध्ये बेवारस प्रेतं फेकली नाहीत, असा घणाघात करत गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही मोदींच्या या टीकेला उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या होत्या, कोविडच्या काळात लोकांनी एकमेकांना धावून – धावून मदत केली. मला कोरोना काळात एक फोटो कुणी तरी पाठवला होता. एक महिला तिच्या मागे बॅग होती. त्यावर मूल झोपलं होतं. वडील बॅग ओढत होते. खाली एक टॅग लाईन होती. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मै, मला पंतप्रधानांना तोच सवाल करायचा आहे. माननीय पंतप्रधानजी तुमसे नाराज नही हूँ. हैरान हूँ मै आपसे. आम्ही सुपर सप्रेड आहोत, असं कसं बोललात, असा सवाल केला होता. आता त्याच्याही पुढे जात राऊतांनी मोदींवर रोखठोक शब्दात वार केलाय.
काय म्हणाले राऊत?
राऊत म्हणाले की, कितीही प्रयत्न करा. खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमकावा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे. कुणाला गुडघे टेकायचे असतील, कुणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल, महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर कोरोना म्हणालात. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रामध्ये बेवारस प्रेतं फेकली नाहीत आणि महाराष्ट्रात सुपर स्प्रेडर…? हे योग्य नाही.. ईडीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मोदी खोटे बोलले
लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, असा थेट आरोप मोदींनी केलाय. गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसने संशय घेतला. त्यांच्यावर केलेली कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असल्याचे मोदी म्हणाले होते. या आरोपाचाही राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं…ते माझ्या आयुष्यात मला जेव्हापासून कळलं तेव्हापासून सांगतो की, ने मजसी नेला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांना काढलं असेल, तर ते गाणं वाजवतील कशाला, असा सवाल करत रेकॉर्डमध्ये असं काही नाही, असा दावा राऊत यांनी केलाय.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?