Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविंद्र जडेजाच्या पत्नीचं कंबरेएवढ्या पाण्यात उतरत बचावकार्य, गुजरातमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत

रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पावसामुळे अनेकजण अडकल्यामुळे रिवाबा जडेजा या स्वत: कंबरेइतक्या पाण्यात बचावासाठी उतरल्या आहेत.

रविंद्र जडेजाच्या पत्नीचं कंबरेएवढ्या पाण्यात उतरत बचावकार्य, गुजरातमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत
रविंद्र जडेजाच्या आमदार पत्नीचं कंबरेएवढ्या पाण्यात उतरत बचावकार्य
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 10:41 PM

गुजरातमध्ये पावसाने अक्षरश: थैमान माजवलं आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक शहर आणि गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये 10 ते 12 फुटापर्यंत पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 23 हजार पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. परिस्थिती इतकी भीषण झालीय की, बचाव कार्यासाठी सैन्याची मदत घेतली जात आहे. अशा संकट काळात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याची आमदार असलेली पत्नी रिवाबा जडेजा या स्वत: मदतीसाठी पाण्यात उतरल्या आहेत. रिवाबा जडेजा जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पावसामुळे अनेकजण अडकल्यामुळे रिवाबा जडेजा या स्वत: कंबरेइतक्या पाण्यात बचावासाठी उतरल्या आहेत.

रिवाबा जडेजा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर बचाव कार्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत रिवाबा कंबरेइतक्या पाण्यात उभ्या आहेत. त्यांच्याकडून बचावकार्याची पाहणी केली जात आहे. तसेच अडकलेल्या नागरिकांना व्यवस्थित आणि सुरक्षित येण्याचं आवाहन केलं जात असल्याचं व्हिडीओत बघायला मिळालं आहे. संबंधित व्हिडीओ शेअर करत रविंद्र जडेजाने आल्या पत्नीचं कौतुक केलं आहे.

रिवाबा जडेजा नेमकं काय म्हणाल्या?

रिवाबा जडेजा यांनी नंतर अधिकाऱ्यांशीदेखील बातचित केली. याबाबत रिवाबा यांनी ट्विट करत माहिती दिली. “मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्य आणि अन्न पाकिटांचे वाटप यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि संरक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत गरज असेल तेथे हेलिकॉप्टर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच प्रभाग 2 मध्ये असलेल्या पुनित सोसायटीत अडकलेल्या कुटुंबांना बाहेर काढण्याच्या कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी प्रभाग अध्यक्ष प्रज्ञेशभाई भट्ट, नगरसेवक जयराजसिंह जडेजा, जयेंद्रसिंह झाला आणि कार्यकर्ते उपस्थित होते”, असं रिवाबा जडेजा म्हणाल्या.

वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'.
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी.
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा.
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले.
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार.