Watch Video | औकातीत राहा… रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांची महापौर आणि खासदारासोबत बाचाबाची
भाजपच्या आमदार रिवाबा जडेजा भाजपच्या खासदार आणि महापौर यांना भिडल्या. तिघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
Rivaba Jadeja Fight | भाजपच्या आमदार आणि भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांची जामनगरच्या महापौर आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जामनेरमधील लखोटा तलावावर जामनगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या कार्यक्रमादरम्यान हा वाद पाहायला मिळाला. रिवाबा यांनी महापौर आणि खासदारांना फटकारले.
भाजपच्या खासदार पूनमबेन हेमतभाई मॅडम यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि महापौरांनी नाराज झालेल्या पक्षाच्या आमदाराला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा रिवाबा त्यांच्यावरच संतापल्या.
रिवाबा यांना राग अनावर ?
जामनेर शहरातील लखोटा तलावावर जामनगर महापालिकेतर्फे ‘मारी माती-मारो देश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजप आमदार रिवाबा जडेजा आणि महापौर बिनाबेन कोठारी यांच्यात वादावादी झाली. जेव्हा महापौरांनी रिवाबाला तिच्याशी शिष्टाचाराने बोलण्यास सांगितले तेव्हा रिवाबाने तिला “तिच्या मर्यादेत” राहण्यास सांगितले.
दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या खासदार पूनम मॅडम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, रिवाबा यांनीही ही आग आपल्याकडूनच लागली आहे, त्यामुळे ती विझवण्याचा प्रयत्न करू नका, असेही म्हटले.