दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅकेनं ( RBI) सलग 11 वेळा रेपो रेट चार टक्क्यांवर ठेवण्याचा निर्णय (big decision) घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) पुन्हा एकदा धोरणात्मक दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज रेपो दरात कोणताही बदल होणार नसल्याचे जाहीर केले. रेपो दर पूर्वीप्रमाणेच 4 टक्के वर कायम राहील. ही सलग 11वी बैठक आहे ज्यामध्ये RBI च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे गृह कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. गृहकर्ज घेणाऱ्यांचे रेपो रेटकडे विशेष लक्ष असते. करण, यामुळे थेट परिणाम व्याजदरावर होते. मात्र, यावेळी देखील गृहकर्ज घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
LIVE: Monetary Policy statement of the @RBI Governor @DasShaktikanta https://t.co/U7nLcKj0zm pic.twitter.com/5yo7IobKdl
— DD News (@DDNewslive) April 8, 2022
चलनविषयक धोरण समितीने सर्वानुमते व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने शेवटची दर कपात मे 2020 मध्ये केली होती. कोरोनाव्हायरस संसर्गामुळे RBI ने फेब्रुवारी 2019 ते मे 2020 पर्यंत रेपो दरात 2.50% कपात केली होती. दर कमी केल्याने वाढीस प्रोत्साहन मिळते. दर वाढवताना रिझर्व्ह बँकेला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. गेल्या काही महिन्यांपासून महागाई आरबीआयच्या कक्षेबाहेर आहे. अशा स्थितीत यावेळी रिझर्व्ह बँक दर वाढवू शकते, असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत होते. यासोबतच त्यांची आर्थिक धोरणाबाबतची भूमिका अनुकूल ठेवण्यात आली आहे. शेवटच्या वेळी रेपो दर 22 मे 2020 रोजी बदलला होता. तेव्हापासून रेपो दर 4% च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर राहिला आहे.
रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती दर दोन महिन्यांनी धोरण आढावा बैठका घेते. 6 एप्रिल रोजी सुरू झालेली आर्थिक वर्ष 2023 ची ही पहिली आढावा बैठक आहे. तीन दिवसांच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
किरकोळ चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो एका महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये 6.01 टक्के होता. महागाई दर 4 टक्के ते 6 टक्केच्या श्रेणीत ठेवण्याचे RBI चे लक्ष्य आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची आर्थिक वर्ष 2023 मध्ये सहा वेळा बैठक होणार आहे. पुढील बैठक 6 जून ते 8 जून दरम्यान होणार आहे. त्यामुळे आता या बैठकांकडेक अनेकांचे लक्ष लागून आहे.
इतर बातम्या
Nitesh Rane: नितेश राणेंचा 5 लाखांचा गुड बिहेवियर बाँड भरण्यास नकार; नेमकं कारण काय?
Latur : गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू
Bhandara Crime | लाखनीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; दुचाकीवर बसवणाऱ्या दोन आरोपींना अटक