RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उर्जित पटेल यांचे मोदी सरकारशी मतभेद झाल्याची चर्चा सुरु झाली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करणं, सन्मानाचं होतं, अशी प्रतिक्रिया उर्जित पटेल […]
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उर्जित पटेल यांचे मोदी सरकारशी मतभेद झाल्याची चर्चा सुरु झाली होती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करणं, सन्मानाचं होतं, अशी प्रतिक्रिया उर्जित पटेल यांनी दिली.
कोण आहेत उर्जित पटेल?
25 सप्टेंबर 1963 रोजी जन्मलेल्या उर्जित पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बीएची पदवी घेतली. 1986 मध्ये उर्जित पटेल यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम फिल पूर्ण केलं.
बोस्टन कन्सलटिंग ग्रुपचे ते सल्लागार होते. पीएचडीनंतर त्यांनी 1990 साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत (IMF) काम करण्यास सुरुवात केली. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी वॉशिंग्टन येथे आयएमएफमध्ये एकत्रित काम केले होते.
त्यानंतर ते आरबीआयमध्ये सल्लागार म्हणून रुजू झाले. भारतातील आर्थिक सुधारणांसाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये उर्जित पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यानंतर 1998 ते 2001 या काळात केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. 2013 साली ते आरबीआयच्या डेप्युटी गर्व्हनरपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पटेल यांच्याकडे मुद्रा नीती विभागाची जबाबदारी होती.
आरबीआयच्या गव्हर्नर पदी उर्जित पटेल यांची निवड झाल्याची घोषणा 20 ऑगस्ट 2016 रोजी झाली. त्यानंतर 6 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी प्रत्यक्षात गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारला. वयाच्या 52 व्या वर्षी उर्जित पटेल यांची 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली.
मोदी सरकारसोबत वाद
रिझर्व्ह बँक आणि मोदी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादावादी सुरु होती. सरकार सेक्शन 7 लागू करण्यावरुन हा वाद सुरु होता. मात्र सध्या उर्जित पटेल यांनी आपण वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहोत, असं म्हटलं आहे.
रघुराम राजन यांच्या जागी मोदी सरकारच्या मर्जीतील उर्जित पटेल यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली होती. मात्र केंद्र सरकार आरबीआयमधील पैसे मागत असल्यामुळे त्यांच्यातही वाद सुरु होते. अखेर या वादाचे पुनर्वसन उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यातून झालं असंच म्हणावं लागेल.