RBI ने रेपो रेटमध्ये केली वाढ, पाहा तुमच्यावर थेट कसा होईल परिणाम

भारतीय रिजर्व्ह बँकेने आज रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. ही लागोपाठ पाचवी वाढ आहे. RBI ने रेपो रेट 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे. आरबीआयच्या या निर्णयाच्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे. यामुळे कर्ज घेतलेल्या लोकांवर किती परिणाम होणार आहे. महागाई वाढणार का याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

RBI ने रेपो रेटमध्ये केली वाढ, पाहा तुमच्यावर थेट कसा होईल परिणाम
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 3:24 PM

RBI Repo Rate Hike : देशात महागाई दर अजूनही उच्च स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये आता 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर आता रेपो रेट हा 6.25 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेलं Home Loan, Personal Loan किंवा Car Loan चा EMI वाढणं हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे महागाईचा सरळ फटना सर्वसामान्यांना बसणार आहे. आरबीआयने व्याजदरात वाढ केली तर याचा परिणाम काय होतो. चला जाणून घेऊया.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे काय ( What is Repo Rate? ) हे आधी जाणून घेणार आहोत. आरबीआय देशात सर्वच बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. सर्व बँका या आरबीआयकडूनच पैसे उधार घेतात. त्यामुळे आरबीआय ज्या रेटवर बँकांना कर्ज देते. त्यालाच रेपो रेट म्हणतात.

बँक लोन आणि रेपो रेटचा संबंध काय?

जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा Capital Cost देखील वाढतो. याचाच अर्थ लोनवर पैसे देणं आणखी महाग होतं. बँका ही रक्कम लोनच्या रुपात दिलेल्या पैशांमधून वसूल करते. ज्यामुळे व्याजदरांमध्ये चढ-उतार होत असतो.

आरबीआयच्या नियमानुसार बँकांना व्याजदर नियंत्रणात ठेवावी लागते. यासाठी कर्जावरील व्याजदर रेपो रेट सोबत लिंक करावे लागते.( Repo Rate Linked Interest Rate ).

रेपो रेट आणि महागाई?

रेपो रेट आणि महागाई यांचा सरळ संबंध येतो. जेव्हा बँकांकडून कमी व्याजदरात लोन मिळतं तेव्हा इकोनॉमीमध्ये जास्त पैसे येतात. याचा अर्थ बाजारात रोख रक्कम वाढते. (Liquidity Increased in Market). बाजारात रोख रक्कम वाढल्याने खरेदी करण्याचा क्षमता (Purchasing Power) वाढते. ज्यामुळे वस्तूंची मागणी वाढते.

जेव्हा लोन महाग होतं. तेव्हा याचा परिणाम सरळं वस्तूंच्या मागणीवर होते. लोकं बचत करतात. पैसे खर्च करणं टाळतात. ज्यामुळे मागणी कमी होते. यामुळे महागाई वाढते. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरात सेंट्रल बँकांनी व्याजदरात वाढ करण्याचा मार्ग निवडला आहे.

महागाई आणखी वाढणार?

देशात महागाई आणखी वाढणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ती 6.77 टक्के होती. 10 व्या महिन्यात देखील महागाई दर 6 टक्क्याहून अधिक राहिली आहे. आरबीआयचा प्रयत्न असतो की, महागाई दर 4 टक्क्यांच्या आत राहावा.

आरबीआयने बैठकीत पुढचे 12 महिने म्हणजेच पुढील वर्षात देखील मगागाई दर 4 टक्क्याहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.