RBI News on 2000 Note : एकावेळी फक्त 20 हजार रुपयांपर्यंत नोटा बदलता येणार, जाणून घ्या नेमके नियम काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटा जमा करण्याबाबत काही नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार एकावेळी नेमके किती रुपये बदलून मिळू शकतात, याबाबतची माहिती देखील जारी करण्यात आली आहे.

RBI News on 2000 Note : एकावेळी फक्त 20 हजार रुपयांपर्यंत नोटा बदलता येणार, जाणून घ्या नेमके नियम काय?
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:24 PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रिझर्व्ह बँकने 2 हजाराच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कालावधी जाहीर करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत नोट बदलू शकतात किंवा बँकेत जमा करु शकतात. सर्वसामान्य नागरिक त्यांचं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेत जावून नोटा बदलू किंवा जमा करु शकतात. पण नोटा जमा करण्याबाबत काही नियम रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आले आहेत. यानुसार आपण एकावेळी किती नोटा जमा करु शकतो, याबाबतही आरबीआयने स्पष्टपणे माहिती दिली आहे.

RBI चे नेमके नियम काय?

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2 हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी काही मर्यादा देखील आखून देण्यात आल्या आहेत. प्रत्येकजण एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेतून नोटा बदलून घेऊ शकता.

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंट अकाउंटधारक एका दिवसाला चार हजार रुपयांपर्यंतचा नोटा प्रत्येकी एका दिवसाला बदलून घेऊ शकतात. याचा अर्थ बँकेत करंट अकाउंट असलेल्या ग्राहकांना दर दिवसाला चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळू शकतात, असं मानलं जात आहे. पण बँकेकडून याबद्दल सविस्तर माहिती दिली जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, 2 हजारच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जाणार नाहीत.

एक महत्त्वाचा मुद्दा 2 हजाराच्या नोटा या चलानातून बाद झालेल्या नाहीत. त्यामुळे या नोटांच्या आधारावर व्यवहार होऊ शकतात. पण हे व्यवहार 30 सप्टेंबरपर्यंतच होऊ शकतात. तोपर्यंत या नोटा चलनात सुरु राहतील आणि व्यवहार होऊ शकतात.

2 हजाराच्या जागी आता 1 हजाराची नोट येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि 1 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारकडून त्या जागेवर 2 हजाराच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. या नोटा गेल्या 6 वर्षांपासून चलनात आहेत. पण या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बाजारात फार दिसत नव्हत्या. अगदी कमी प्रमाणात या नोटा दिसत होत्या. अखेर या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बँक त्याऐवजी 1 हजाराच्या नोटा आणतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.