शिवीगाळ, दादागिरी करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना बसणार चाप, आरबीआय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत..

या अशा धमक्या देणे, हे खरेतर बेकायदेशीर आहे, मात्र सध्याच्या दिवसात हे अगदी सहजपणे सुरु असलेले दिसते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या लोन रिकव्हरी एजेंटसच्या या हरकतींची दखल घेतली असून, आता यावर कठोर उपाय करण्यात येणार आहेत.

शिवीगाळ, दादागिरी करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना बसणार चाप, आरबीआय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत..
महागाईच्या पुन्हा झळा Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:30 PM

मुंबई – कर्ज वसुली करण्यासाठी कर्जदारांवर दादागिरी, शिवीगाळ करणाऱ्यांना लवकरच चाप बसणार आहे. लोन रिकव्हरी एजंट्सची ही वागणूक अस्वीकारार्ह आहे, असे स्प्षट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने हे गांभिर्याने घेतले असून, या प्रकरणात कठोर कारवाईची पावले आगामी काळात उचलली जाणार आहेत. साधारणपणे आपातकालीन स्थितीत, अचानक काही आवश्यक निकड असेल तेव्हाच सामान्य नागरिक कर्ज घेतात. अनेकदा असेही होते की, कर्जदारांची कर्ज फेडण्याची इच्छा असते, सुरुवातीचे काही हप्ते ते भरतातही, मात्र त्यानंतर आर्थिक स्थितीमुळे, उत्पन्नात पडलेल्या खंडामुळे त्यांना पुढचे हप्ते भरणे शक्य होत नाही. त्यामुळे असे कर्जदार डिफॉल्टरच्या यादीत जातात. त्यानंतर बँका लोन रिकव्हरी एजंट्सच्या माध्यमातून या कर्जदारांना त्रास देण्यास सुरुवात करतात.

लोन रिकव्हरी एजंटसकडून कर्जदारांचा होतो छळ

लोन रिक्वहरी एजंटसचे काम हे कर्ज वसूल करणे असते. त्यासाठी ते साम, दाम, दंड, भेद असा कोणत्याही प्रकाराचा उपयोग करतात. वेळी-अवेळी फोन करुन, ते कर्जदारांवर दादागिरी करतात तसेच शिवीगाळही करतात. या अशा धमक्या देणे, हे खरेतर बेकायदेशीर आहे, मात्र सध्याच्या दिवसात हे अगदी सहजपणे सुरु असलेले दिसते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या लोन रिकव्हरी एजेंटसच्या या हरकतींची दखल घेतली असून, आता यावर कठोर उपाय करण्यात येणार आहेत.

लोन रिकव्हरी एजंट्सची वागणूक अस्वीकारार्ह

हे लोन रिकव्हरी एजंट्स चुकीचे वागत आहेत, त्यांची वागणूक स्वीकारण्यासारखई नाही, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. लोन रिक्वहरी एजंट्स वेळी अवेळी कर्जदारांना करत असलेले फोन, तसेच त्यांच्यावर करत असलेली दादागिरी अयोग्य असल्याचे दास म्हणाले आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक गंभीर असून, याबाबत कठोर पावले उचलण्यात कचराई करणार नाही, असेही दास यांनी स्पष्ट केले आहे. ज्या अनियंत्रित फायनान्स कंपन्या आहेत, त्यांच्याकडून हे प्रकार सर्रास होतात, याबाबतच्या तक्रारीही मिळालेल्या आहेत. तर काही नियंत्रित फायनान्स कंपन्यांकडूनही असे प्रकार होत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. आता याबाबत तक्रारी आल्यानंतर कायदेशीर कारवाई करणाऱ्या यंत्रणांना याची माहिती देण्यात येणार असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले आहे. सर्व बँकांनाही यबाबतच्या सूचना देण्यात आले असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

लोन रिकव्हरीबाबत आरबीआयच्या काय आहेत गाईडलाईन्स

  1. कर्ज वसुलीसाठी लोन रिकव्हरी एजेंट्स धमकी किंवा दादागिरी करु शकत नाहीत, तसेच शारिरिक दुखापत वा तोंडी शिवीगाळही करु शकत नाहीत.
  2. कर्जदारांना सकाळी ९ पूर्वी आणि संध्याकाळी ६ नंतर फोन करणे हे त्रास देण्यात मोडते, त्यामुळे असे फोन करणे हाही गुन्हाच आहे.
  3. कर्जवसुलीसाठी गुंडगिरीचा वापर करणे किंवा त्याची धमकी देणे, हे छळातच मोडते.
  4. कर्जदार काम करत असलेल्या कामाच्या ठिकाणी सूचना न देता जाणे, नातेवाईक, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना धमकतीचे फोन करणे, त्रास देणे हाही छळच मानला जातो. धमकीत अभद्र भाषेचा वापरही छळाचाच भाग मानला जातो.

कर्जदाराच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँक करु शकते ही कारवाई

जर कर्जदारांना रिकव्हरी एजेंट्स त्रास देत असतील तर त्यांनी

  1. सुरुवातीला पहिली तक्रार बँकेत करायला हवी. बँकेने या तक्रारीची दखल ३० दिवसांत घएतली नाही तर याची तक्रार वरिष्ठ पातळीवर आणि रिझर्व्ह बँकेकडेही करता येऊ शकते.
  2. रिझर्व्ह बँक या प्रकरणात बँकांना निर्देश देऊ शकते, आणि गरज पडल्यास बँकांना दंडही करु शकते.
  3. थेट रिझर्व्ह बँकेकडे रिकव्हरी एजंटच्या गुंडगिरीची तक्रार रिझर्व्ह बँकेकडे केल्यास रिझर्व्ह बँक यावर कारवाईचे निर्देश देऊ शकते.

कर्जदारांकडे कोर्टात जाण्याचाही पर्याय

  1. जर रिकव्हरीने बेकायदेशीर कारवाी केली, मारहाण केली, घरातील एखादी वस्तू जप्त केली तर कर्जदार पोलिसांत तक्रार करु शकतो.
  2. जर रिकव्हरी एजंट जास्तच त्रास देत असेल, चुकीची कृती केली केली असेल, चुकीचे पत्र पाठवले असेल तर त्याच्या आधारावर कोर्टात वकिलामार्फत जाता येणे शक्य असते.
  3. लोक अदालत किंवा ग्राहक कोर्टात जाण्याचा पर्याय या कर्जदारांसमोर असतो.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.