दक्षिण भारतात Red Alert, सलग 26 दिवस पावसाचा कहर, नोव्हेंबरमध्ये भारतात 143% जास्त पाऊस
भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तामिळनाडू, पुडुचेरी, केरळसाठी विशेष पूर सूचना (Special Flood Advisory) जारी करण्यात आली आहे. रेड अलर्ट दिला गेला आहे.
चेन्नईः दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरूच आहे. बहुतेक भागांमध्ये पूर आला आहे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान या दक्षिण भारतात 63 % अतिरिक्त पाऊस झाला आहे. तर, 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पुर्ण भारतात 143.4% अधिक पावसाची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारताला अनेक वेळा मुसळधार पावसाचा सामना करावा लागला आहे. मात्र, यावेळी अनेक भागात पुराचा कहरही पाहायला मिळाला.
भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तामिळनाडू, पुडुचेरी, केरळसाठी विशेष पूर सूचना (Special Flood Advisory) जारी करण्यात आली आहे. आणि रेड अलर्ट जारी केला आहे.
#Thuraiyur in Trichy#TamilNaduRains #ChennaiRains #TamilNadu https://t.co/KmKRm7T4Vu
— SkymetWeather (@SkymetWeather) November 26, 2021
1 ऑक्टोबरपासून ईशान्य मान्सून सिजन दरम्यान तामिळनाडूमध्ये 61 टक्के, पुद्दुचेरीमध्ये 83, कर्नाटकात 105 आणि केरळमध्ये 110 टक्के अधिक पाऊस झाला आहे. या महिन्यात पावसामुळे चेन्नई आणि आंध्र प्रदेशातील सीमाभागांना भिषण पुराला सामोरं जाव लागलं. एकूणच, दक्षिण भारतातील सामान्य जनजीवन अनेक दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुरुवार आणि शुक्रवारी तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत 3523.3 मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस 2018 च्या तुलनेत थोडा जास्त आहे, जेव्हा राज्यात भीषण पूर आणि प्रचंड नुकसान झाले होते. यंदा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाऊस दक्षिण भारतात पाऊस झालाय. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या सात महिन्यांत जास्त पाऊस झाला आहे.
Very heavy rains lashing! #ChennaiRains Stay safe! @ChennaiRains #Perumbakkam pic.twitter.com/dh1Cn7FfXK
— Vadivelan *⃣ (@Vadivelanmadhan) November 26, 2021
गेल्या आठवड्यात, पुरामुळे तिरुमला, तिरुपतीमध्ये शेकडो यात्रेकरू अडकले होते. पुरामुळे मूर्ती पाण्याखाली गेल्याने मंदिर परिसरात भीषण स्थिती होती. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. विमान आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली. तिरुपतीचे रहिवासी सोशल मीडियावरलोकांना तिरुपतीचा प्रवास रद्द करण्याचे आवाहन करत होते.
नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारताला अनेक वेळा मुसळधार पावसाचा सामना करावा लागला आहे. मात्र, यावेळी अनेक भागात पुराचा कहरही पाहायला मिळाला. सक्रिय ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये वारंवार पाऊस पडत आहे, असे IMD चे महासंचालक एम महापात्रा म्हणाले. या महिन्यात जवळजवळ प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरावर सतत कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीवादळ तयार होत आहे. 29 नोव्हेंबर रोजी अंदमान समुद्रावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या