लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!
शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणारा अभिनेता दीप सिद्धूला तब्बल 14 दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. (Red Fort Violence: Delhi Police Arrests Deep Sidhu, Inquiry underway)
नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणारा अभिनेता दीप सिद्धूला तब्बल 14 दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असून या चौकशीत पोलिसांना लाल किल्ल्यात पोहोचण्याचं प्लानिंगच सांगितलं. तसेच आपला कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. मात्र, तोडफोड करण्याचं समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असं सांगतानाच केवळ भावनेच्या भरात आपण शेतकरी आंदोलनात सामील झाल्याचं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं. (Red Fort Violence: Delhi Police Arrests Deep Sidhu, Inquiry underway)
सरकारशी चर्चा करताना आणि ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी नेते नरमाईचं धोरण घेत होते, असा माझा संशय होता, असं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्याचवेळी ऑगस्टपासून पंजाबात शेतकरी आंदोलन सुरू झालं आणि मी त्याकडे आकर्षित झालो, असंही तो म्हणाला.
स्वयंसेवकांचे जॅकेट चोरले
यावेळी त्याने लाल किल्ल्यात पोहोचण्याचा प्लान कसा तयार केला, याची माहितीच पोलिसांना दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी गेल्यावर तिथे त्याला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसला. त्यामुळे 28 नोव्हेंबर रोजी तो दिल्लीत दाखल झाला. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी निर्धारित मार्गावरून न जाण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यामुळे त्याने स्वयंसेवकांचे जॅकेट चोरण्यासही त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले. लाल किल्ल्यावर जातानाच शक्य झाल्यास इंडिया गेटवरही जाण्याचा आमचा प्लान होता. लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यासाठी जुगराज सिंगला खास बोलावण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोटही त्याने केला.
सुखविंदर सिंगला अटक
सुखविंदर सिंग हा सुद्धा या आंदोलनात सरहभागी होता. तो लाल किल्ल्याच्या लाहौरी गेटवर दिसला होता. 2 फेब्रुवारी रोजी गाझीपूर बॉर्डरवर त्याने राकेश टिकैत यांची भेटही घेतली होती. तसेच 6 फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलनातही सहभागी झाला होता. त्याला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.
लक्खा सिधाना सिंधु बॉर्डरवर?
या प्रकरणातील दुसरा आरोपी लक्खा सिधाना याचाही पोलीस शोध घेत आहे. लक्खा सिधाना सातत्याने लोकेशन बदलत असल्याने त्याला पकडणे मुश्किल झालं आहे. तसेच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या जुगराजची लोकेशन कुंडली येथे दाखवली जात आहे. तो पाच दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये आल्याचं दिसून आलं होतं. आता त्याचं लोकेशन सिंधु बॉर्डर दाखवली जात आहे. (Red Fort Violence: Delhi Police Arrests Deep Sidhu, Inquiry underway)
VIDEO : Pune Water Supply : पुणे शहरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार#Pune #PuneWaterSupply pic.twitter.com/m58SsCjoCY
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021
संबंधित बातम्या:
म्हणून आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो, नवनीत राणांची लोकसभेत फटकेबाजी
ममता बॅनर्जींचं सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक, जे.पी. नड्डांचं टीकास्त्र
सचिन, लतादीदींना मतं मांडण्याचा अधिकार नाही का?; आठवले आघाडी सरकारवर भडकले!
(Red Fort Violence: Delhi Police Arrests Deep Sidhu, Inquiry underway)