“धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे” RSS च्या वार्षिक बैठकीत दत्तात्रेय होसाबोळेंचं भाष्य
धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे असं संघाचे कायमच मत राहिलेलं आहे. आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या वार्षिक बैठकीत शनिवारी ते बोलत होते. कर्नाटकातील धारवाडमध्ये तीन दिवसांपासून ही बैठक सुरू होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे धर्मांतराच्या विषयावर भाष्य करतांना म्हणाले की, धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे असं संघाचे कायमच मत राहिलेलं आहे. आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या वार्षिक बैठकीत शनिवारी ते बोलत होते. कर्नाटकातील धारवाडमध्ये तीन दिवसांपासून ही बैठक सुरू होती. आज या वार्षिक बैठकीचा शेवटचा दिवस होता. (Religion conversion should stop completely in India, RSS said)
होसाबोळे म्हणाले की, कोणी स्वेच्छेने निर्णय घेत असेल तर गोष्ट वेगळी, पण तसे होत नाही. मग धर्मांतर करणारे दुहेरी लाभ कसे घेऊ शकतात? आता पर्यंत 10 हून अधिक राज्यांच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी विधेयके आणले आहेत. ही सर्व सरकारे भाजपची नाहीत. हिमाचल प्रदेशामध्ये वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने हे विधेयक फार पूर्वी मंजूर केले. अरुणाचल प्रदेश काँग्रेसने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केले.
समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं विधानhttps://t.co/NaRxstugL6#SameerWakhede | #arunhaldar | #NCB | #NawabMalik
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
“दिवाळीत फटाक्यांवर बंदी योग्य नाही”
तीन दिवसीय बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. महागाई- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, अपारंपरिक ऊर्जा/ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांच्या वापरावर, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आसे विषय मांडले गेले.
होसाबोळे यांनी बैठकीत सांगितले की, संघ पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे, मात्र केवळ दिवाळीतच फटाक्यांवर बंदी घालणे हा प्रश्नावर उपाय नाही. इतर देशांमध्येही सणाच्या वेळी फटाके वाजवले जातात. अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रीय दिनी न्यूयॉर्कमध्ये फटाके फोडले जातात. होसबोले म्हणाले की, फटाक्यांवर पूर्ण बंदी घातल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत आणि लोकांचा आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे फटाके बंदीचा निर्णय संबंधित मंत्रालय आणि पर्यावरणतज्ज्ञांशी चर्चा करूनच घ्यावा, असं ते म्हणाले.
Diwali Festival : पुण्यात 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके वाजवण्यास बंदी https://t.co/8DuY4jSGlG @PuneCityPolice @puneruralpolice @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar #Diwali #Diwali2021 #firecrackers #PunePolice #PoliceCommissioner
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
मोहन भागवत काय म्हणाले?
संघाच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लोकसंख्या धोरणाच्या अंमलबजावणीवर भर दिला. भागवत म्हणाले की, सर्वांना समान संधी मिळण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे, कारण नैसर्गिक साधनं मर्यादित आहे, त्यामुळे हे लक्षात घेऊन धोरण बनवणे आवश्यक झाले आहे.
या बैठकीत देशभरातून 350 लोक सहभागी
दोन वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत देशभरातून संघाचे 350 महत्त्वाचे लोक सहभागी झाले होते. होसाबोळे म्हणाले की, कोरोनाच्या काळात आरएसएसच्या शाखांची संख्या कमालीची घटली होती आणि दैनंदिन शाखांची संख्या केवळ 8-10 हजारांवर आली होती. आता ती पुन्हा वाढून 34 हजार झाली आहे.
Other news
समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं विधान
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीची घोषणा, तर वंचितसोबत आघाडीचे ओवेसींचे संकेत!
VIDEO: आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही; नवाब मलिकांनी ठणकावले
Religion conversion should stop completely in India, said RSS