Republic Day 2022 : 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँड, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं संचलन कसं असणार?
आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झाली आहे.
नवी दिल्ली: आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झाली आहे. 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँडचं प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन (Republic Day of India) होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (republic day parade) आज एक पीटी 76 टँक, एक सेंच्युरियन टँक, दोन एमबीटी अर्जुन एमके आय टँक, एक ओटी 62 टोपस कर्मी वाहक, बीएमपीचे दोन सैन्य लढाऊ वाहन असेल. पीटी 76, सेंच्युरियन टँख , ओटी 62 आणि 75/24 पॅक होवित्जर ने 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 75/24 पॅक होवित्जर आणि दोन धनुष होवित्जर, पीएमस प्रणाली, एचटी-16, दोन तरण इलेक्ट्रिकॉनिक युद्ध प्रणाली आणि एक टायगर कॅट मिसाईल प्रणाली आणि आकाश प्रणाली देखील यामध्ये समाविष्ट असेल.
16 मार्चिंग टीम सहभागी होणार
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आर्मीची राजपूत रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री, शीख लाईट इन्फंट्री, आर्मी ऑर्डिनन्स कोर रेजिमेंट, पॅराशूट रेजिमेंट आणि भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या एका मार्चिंग दलाचा समावेश असेल. केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक पोलीस दल, सशस्त्र सीमा बल, भारतीय तटरक्षक, सीमा सुरक्षा बल यांच्या पाच तुकड्या संचलनात सहभागी होतील. भारतीय सेना दल, निमलष्करी सैन्य दलं, दिल्ली पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या एकूण 16 मार्चिंग टीम संचलनात सहभागी होतील.
10.30 वाजता संचलन सुरु
सैन्यदलानं दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी संचलनाचा सोहळा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय वॉर मेमोरियलला अभिवादन करतील. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला 10.30 सुरुवात होईल आणि तो 12 वाजता संपन्न होईल. इंडो तिबेटियन पोलीस दलाच्या पुरुषांची आमि सीमा सुरक्षा बलाची महिला टीम मोटार सायकाल वर आपली कौशल्य दाखवतील.लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, जनरल ऑफिसर कमांडिंग दिल्ली एरिया परेड कमांडर असतील. मेजर आलोक काकर, चीफ ऑफ स्टाफ दिल्ली एरिया, परेड सेंकड इन कमांड असतील. परडेच्यावेळी विजय चौक नॅशनल स्टेडियमपासून राजपथावर मार्च केला जाईल.
इतर बातम्या
‘
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होण्याआधी हा दिवस भारताचा स्वातंत्रदिन होता, खरंच!
Republic Day 2022 17 military bands 16 teams of Security Forces 25 five states tableux participate in today parade check details here