Republic Day 2022 Live Updates : राजपथावरील संचलन सोहळा संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा
Republic Day Parade 2022, Flag Hosting Live Updates: आज आपल्या देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला नवी दिल्ली येथील राजपथावर सुरुवात होत आहे.
Republic Day Parade 2022, Flag Hosting Live Updates: आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँडचं प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन (Republic day of India) संचलन पार पडलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (republic day parade) आज एक पीटी 76 टँक, एक सेंच्युरियन टँक, दोन एमबीटी अर्जुन एमके आय टँक, एक ओटी 62 टोपस कर्मी वाहक, बीएमपीचे दोन सैन्य लढाऊ वाहन असेल. पीटी 76, सेंच्युरियन टँख , ओटी 62 आणि 75/24 पॅक होवित्जर ने 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 75/24 पॅक होवित्जर आणि दोन धनुष होवित्जर, पीएमस प्रणाली, एचटी-16, दोन तरण इलेक्ट्रिकॉनिक युद्ध प्रणाली आणि एक टायगर कॅट मिसाईल प्रणाली आणि आकाश प्रणाली देखील याद्वारे संचलन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत संचलन सुरु संपन्न झालं.
भारतीय हवाई दलाच्या साहसी प्रात्याक्षिकांनतर राष्ट्रगीतानं संचलन सोहळा संपन्न झाला. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित समुदायाला अभिवादन केलं. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित जनसुमदायाला अभिवादन करताना दिसून आलं.
Republic day 2022 26 january india live updates rajpath parade celebrations covid restrictions president ramnath kovind Narendra Modi Maharashtra CM Uddhav Thackray
LIVE NEWS & UPDATES
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राजपथावरील सोहळ्याचा समारोप
भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनतर राष्ट्रगीतानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं करण्यात आलेल्या संचलनाचा समारोप करण्यात आला.
-
म्ही वसुंधरा ! झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा, महाराष्ट्राच्या चित्ररथाचं दिमाखात दर्शन
…जपतो आम्ही जैव वारसा,जपतो आम्ही वसुंधरा ! झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !!. असा संदेश देत महाराष्ट्राच्या जैवविविधता मानके संकल्पनेवरील चित्ररथाचे आज ७३व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर दमदार सादरीकरण झाले.#RepublicDayParade2022 @MahaDGIPR pic.twitter.com/6L4utTxVhr
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) January 26, 2022
-
-
राजपथावर स्त्री शक्तीचे प्रदर्शन,
राजपथावर स्त्री शक्तीचे प्रदर्शन
राजपथावर स्त्री शक्तीचे प्रदर्शन, 73 व्या #RepublicDay संचलनात @indiannavy च्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट प्रीती यांनी केले
चित्ररथात नौदलाच्य 1946च्या उठावाचेही दृश्य, हा उठाव देशाच्या स्वातंत्र्यालढ्याला प्रेरणा देणारा ठरला#RepublicDayIndiapic.twitter.com/GnoCytxair
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) January 26, 2022
-
भारतीय हवाई दलाची प्रात्याक्षिक
भारतीय हवाई दलाची प्रात्याक्षिक
Grand finale of the Republic Day parade – the fly-past with 75 aircraft of the Indian Air Force pic.twitter.com/k2SnYgTYeC
— ANI (@ANI) January 26, 2022
-
बीएसएफच्या महिला जवानांची मोटार सायकलवरील थरारक प्रात्याक्षिक
बीएसएफच्या महिला जवानांची मोटार सायकल प्रात्याक्षिक, सीमा भवानी यांनी त्याचं नेतृत्त्व केलं.
Seema Bhawani motorcycle team of the Border Security Force (BSF) wow crowds at the Republic Day parade pic.twitter.com/W2K77CvbJX
— ANI (@ANI) January 26, 2022
-
-
राजपथावर नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचं दर्शन
नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचं दर्शन राजपथावर घडवण्यात येत आहे. राजपथावरील या सादरीकरणात 480 कलाकार सहभागी झाले आहेत. वंदे भारतकडून सादरीकरण करण्यात येत आहे. राजपथावर भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिसून आलंय.
-
पंजाबच्या चित्ररथातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पंजाबचं योगदानाचं दर्शन
पंजाबच्या चित्ररथातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पंजाबचं योगदान दर्शवणारा चित्ररथ सादर करण्यात आला.
#RepublicDayParade | Depicting 'Punjab's contribution in freedom struggle', the tableau of the state depicts Bhagat Singh, Rajguru & Sukhdev. It also depicts protest against the Simon Commission led by Lala Lajpat Rai and Udham Singh shooting Michael O'Dwyer.#RepublicDayIndia pic.twitter.com/xNy8Xs9J3B
— ANI (@ANI) January 26, 2022
-
जलजीवन मिशन मंत्रालयाच्या वतीनं पाण्याचं महत्तवं सांगणारा चित्ररथ
जलजीवन मिशन मंत्रालयाच्या वतीनं पाण्याचं महत्तवं सांगणारा चित्ररथ सादर करण्यात आला. सीआरपीएफनं सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा असणारा चित्ररथ सादर केला. तर, विधी व न्याय मंत्रालयानं सर्वांसाठी समान न्याय असल्याचं दर्शन घडवणारा चित्ररथ दाखवला.
-
उत्तर प्रदेशच्या झांकीतून भारताच्या 75 वर्षांच्या प्रगतीचं दर्शन
उत्तर प्रदेशच्या झाकीतून भारताच्या 75 वर्षांच्या प्रगतीचं दर्शन घडवण्यात आलं आहे. याशिवाय काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं देखील दर्शन करण्यात आलं आहे.
-
छत्तीसगडच्या चित्ररथातून गोधन योजनेचं दर्शन
छत्तीसगडच्या चित्ररथातून गोधन योजनेचं दर्शन घडवण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील जीवन चित्ररथातून मांडण्यात आलं आहे.
-
शीख लाईट एन्फंट्रीच्या पथकाचा संचलन सोहळ्यात सहभाग
राजपथावर प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्त शीख लाईट एन्फंट्रीच्या पथकानं सहभाग घेतला. मनोज नरवणे हे या रेजिमेंटचे कर्नल आहेत.
-
सीआरपीएफच्या बँड पथकाकडून हम हे देश के रक्षकचा गजर
सीआरपीएफच्या बँड पथकाकडून हम हे देश के रक्षकचा गजर
सीआरपीएफच्या बँड पथकाकडून हम हे देश के रक्षकचा गजर #CRPF | #IndianArmy | #Republicday pic.twitter.com/8280HYyT5h
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2022
-
राजपथावर भारतीय हवाई दलाकडून आत्म निर्भर भारताचं दर्शन
राजपथावर भारतीय हवाई दलाकडून आत्म निर्भर भारताचं दर्शन #India | #AirForce | #RepublicDayParade pic.twitter.com/p9ta5xqxNq
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2022
-
भारतीय नौदलाच्या चित्ररथातून स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव वर्षाचं दर्शन
भारतीय नौदलाच्या चित्ररथातून स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय नौदलाच्या चित्ररथातून स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी माहिती देण्यात आली आहे. #IndianNavy | #Republicday pic.twitter.com/Zpuc3we2GT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2022
-
जगातील एकमेव घोडदळाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी
जगातील एकमेव घोडदळाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी
#RepublicDay parade | The first contingent is of the 61 Cavalry. It is the only serving active Horse Cavalry Regiment in the world pic.twitter.com/NfLQNoa68H
— ANI (@ANI) January 26, 2022
-
Republic Day : सेंच्युरियन टँकचं राजपथावर संचलन
Republic Day : सेंच्युरियन टँकचं राजपथावर संचलन
Detachments of Centurion Tank, PT-76, MBT Arjun MK-I, and APC Topaz participate in the #RepublicDay parade at the Rajpath in Delhi. pic.twitter.com/dKUJTS0QFT
— ANI (@ANI) January 26, 2022
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते धव्जारोहण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर ध्वजारोहण करण्यात आलं.
President Ram Nath Kovind leads the nation in celebrating the 73rd #RepublicDay
The 21-Gun Salute is presented by Ceremonial Battery of 871 Field Regiment pic.twitter.com/gGBVxC2qkX
— ANI (@ANI) January 26, 2022
-
Republic Day Parade : फोर एमआय 17V5 हेलिकॉप्टरची साहसी प्रात्यक्षिक सादर
Delhi | Four Mi-17V5 helicopters of the 155 Helicopter Unit flying in a wineglass formation at Republic Day parade pic.twitter.com/xrJ2HQ4f1c
— ANI (@ANI) January 26, 2022
Published On - Jan 26,2022 10:36 AM