नेताजी, उत्तराखंड, मणिपूर की रावत? प्रजासत्ताक सोहळ्यात मोदींच्या टोपी आणि गमछाची देशभर चर्चा

राजधानी दिल्लीत राजपथावर आज प्रजासत्ताक दिनाचं दिमाखदार संचलन झालं. यावेळी देशाच्या हवाई, नाविक आणि लष्करी दलाच्या शक्तीचं प्रदर्शनही घडलं. तसेच विविध राज्यांच्या चित्र रथांनीही संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. हा दिमाखदार सोहळा सुरू असतानाच चर्चा मात्र एकाच गोष्टीची वारंवार होत होती.

नेताजी, उत्तराखंड, मणिपूर की रावत? प्रजासत्ताक सोहळ्यात मोदींच्या टोपी आणि गमछाची देशभर चर्चा
Republic Day 2022: pm narendra modi in uttarakhand topi and manipur gamcha
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:51 PM

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत राजपथावर आज प्रजासत्ताक दिनाचं (Republic Day 2022) दिमाखदार संचलन झालं. यावेळी देशाच्या हवाई, नाविक आणि लष्करी दलाच्या शक्तीचं प्रदर्शनही घडलं. तसेच विविध राज्यांच्या चित्र रथांनीही संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. हा दिमाखदार सोहळा सुरू असतानाच चर्चा मात्र एकाच गोष्टीची वारंवार होत होती. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी घातलेल्या टोपीची. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दिवंगत सीडीएस बीपिन रावत (bipin rawat) हे सुद्धा अशीच टोपी घालत होते. आज मोदींनीही हीच टोपी घातली. देशात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विशेषत: सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही निवडणुका होत आहेत. त्यामुळे मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रावत घालत असलेली टोपी निवडणुका पाहून घातलीय का? अशी चर्चा रंगली आहे.

प्रतिकांच्या खुबीने वापर करण्यात माहीर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही प्रजासत्ताक दिनी प्रतिकांचा वापर केला. त्यांनी उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचा गमछा घातला होता. त्यांच्या टोपीवर उत्तराखंडचं राज्य फूल ब्रह्मकमळही लावलेलं होतं. काळ्या रंगाची टोपी त्यांनी घातली होती. या दोन्ही राज्यात पुढच्या महिन्यात मतदान होत आहे. त्यामुळे मोदींच्या या वेशभूषेकडे संकेत म्हणून पाहिलं जात आहे.

नेताजींचा मोठा पुतळा बसवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आले. तिथे दोन मिनिटे मौन पाळून त्यांनी शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर शहीद स्मारकावर पुष्प अर्पण केले. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतही याच ठिकाणी ठेवण्यात आली आहे. तर इंडिया गेटवर सुभाष चंद्र बोस यांची होलोग्रामची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी एक भव्य पुतळा ठेवला जाणार आहे. तोपर्यंत हा तात्पुरता होलोग्रामचा पुतळा ठेवला गेला आहे.

उत्तराखंडची ओळख

बिपीन रावत हे उत्तराखंडमधुन येतात. हा डोंगराळ परिसर आहे. टोपी परिधान करणं ही इथली खासियत आहे. रावतही ही टोपी परिधान करायचे. खासगी कार्यक्रमात रावत नेहमीच या टोपीत दिसायचे. त्यांना श्रद्धांजली म्हणूनच मोदींनी ही टोपी परिधान केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच कालच रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर आज मोदींनी उत्तराखंडची ओळख असलेली टोपी परिधान केल्याने त्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जात आहे.

या टोपीमध्ये दडलंय काय?

काळ्या रंगाची ही टोपी आहे. ही टोपी ट्रेंडी आणि तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. या पारंपारिक टोपीत काही नवीन गोष्टी जोडण्यात आल्या आहेत. या टोपीत ब्रह्म कमल हे राज्य फूल लावण्यात आलं आहे. टोपीला एक पट्टी जोडण्यात आली आहे. त्यावर चार रंग आहेत. हे रंग जीव, निसर्ग, जमीन आणि आकाशाचं प्रतिक आहे. हे रंग हिमालयीन राज्यांचे प्रतिक आहेत. या टोपीला देशातच नाही तर विदेशातही प्रचंड मागणी आहे.

गमछा बुस्टर ठरणार?

उत्तराखंडमध्ये येत्या 14 फेब्रुवारी रोजी 70 जागांवर मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही टोपी घालून उत्तराखंडच्या नागरिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. राजकारणात छोट्या छोट्या गोष्टीच बुस्टर बनत असतात, ही टोपीही भाजपसाठी बुस्टर बनणार का? अशी चर्चा रंगली आहे.

मणिपूरचा गमछा

उत्तराखंडच्या टोपीसह मोदींनी गळ्यात मणिपुरी गमछाही परिधान केला होता. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. भाजपच्या नेतृत्वातील एन. बीरेन सिंह सरकारची या निवडणुकीत कसोटी लागणार असल्याचे सांगितलं जात असताना मोदींनी मणिपुरी गमछा परिधान केल्याने त्याकडे राजकीय संकेताच्या अर्थाने पाहिले जात आहे.

संबंधित बातम्या:

पुष्पा सिनेमानं अल्लू अर्जुनला कसं बनवलं ‘सुपरस्टार अल्लू अर्जुन’, जाणून घ्या…

‘नितेश राणे हाजीर हो!’ सलग तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला हजेरी लावल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय?

महिलांवर अत्याचार करणारी सैतानी वृत्ती मोडून काढलीच पाहिजे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....