RBI, big decision : सलग 11 वेळेस रेपो रेट 4 टक्क्यांवर, गृह कर्जावरचा व्याज ‘जैसे थे’

भारतीय रिझर्व्ह बॅकेनं सलग चौथ्यांना रेपो रेट चार टक्क्यांवर ठवण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI, big decision : सलग 11 वेळेस रेपो रेट 4 टक्क्यांवर, गृह कर्जावरचा व्याज 'जैसे थे'
आरबीआयचा कारवाईचा बडगाImage Credit source: Newsclick
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 12:36 PM

दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅकेनं ( RBI)  सलग 11 वेळा रेपो रेट चार टक्क्यांवर ठेवण्याचा निर्णय (big decision) घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) पुन्हा एकदा धोरणात्मक दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज रेपो दरात कोणताही बदल होणार नसल्याचे जाहीर केले. रेपो दर पूर्वीप्रमाणेच 4 टक्के वर कायम राहील. ही सलग 11वी बैठक आहे ज्यामध्ये RBI च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे गृह कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. गृहकर्ज घेणाऱ्यांचे रेपो रेटकडे विशेष लक्ष असते. करण, यामुळे थेट परिणाम व्याजदरावर होते. मात्र, यावेळी देखील गृहकर्ज घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

11 वेळेस रेपो रेट 4 टक्क्यांवर

विश्लेषकांचा अंदाज काय?

चलनविषयक धोरण समितीने सर्वानुमते व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने शेवटची दर कपात मे 2020 मध्ये केली होती. कोरोनाव्हायरस संसर्गामुळे RBI ने फेब्रुवारी 2019 ते मे 2020 पर्यंत रेपो दरात 2.50% कपात केली होती. दर कमी केल्याने वाढीस प्रोत्साहन मिळते. दर वाढवताना रिझर्व्ह बँकेला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. गेल्या काही महिन्यांपासून महागाई आरबीआयच्या कक्षेबाहेर आहे. अशा स्थितीत यावेळी रिझर्व्ह बँक दर वाढवू शकते, असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत होते. यासोबतच त्यांची आर्थिक धोरणाबाबतची भूमिका अनुकूल ठेवण्यात आली आहे. शेवटच्या वेळी रेपो दर 22 मे 2020 रोजी बदलला होता. तेव्हापासून रेपो दर 4% च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर राहिला आहे.

दर दोन महिन्यांनी आढावा

रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती दर दोन महिन्यांनी धोरण आढावा बैठका घेते. 6 एप्रिल रोजी सुरू झालेली आर्थिक वर्ष 2023 ची ही पहिली आढावा बैठक आहे. तीन दिवसांच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाई नियंत्रणाबाहेर

किरकोळ चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो एका महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये 6.01 टक्के होता. महागाई दर 4 टक्के ते 6 टक्केच्या श्रेणीत ठेवण्याचे RBI चे लक्ष्य आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची आर्थिक वर्ष 2023 मध्ये सहा वेळा बैठक होणार आहे. पुढील बैठक 6 जून ते 8 जून दरम्यान होणार आहे. त्यामुळे आता या बैठकांकडेक अनेकांचे लक्ष लागून आहे.

इतर बातम्या

Nitesh Rane: नितेश राणेंचा 5 लाखांचा गुड बिहेवियर बाँड भरण्यास नकार; नेमकं कारण काय?

Latur : गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

Bhandara Crime | लाखनीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; दुचाकीवर बसवणाऱ्या दोन आरोपींना अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.