Breaking | मुथुट वेईकलसह आणखी एका बड्या फायनान्स कंपनीला आरबीआयचा दणका, लायसन्स रद्द!
एकाच वेळी दोन मोठ्या फायनान्स कंपन्यांवर आरबीआयनं मोठी कारवाई करत त्यांचं लायसन्स रद्द केलंय.
नवी दिल्ली : आरबीआयनं मुथुट व्हेईकल आणि ऍसेट फायनान्स लिमिटेड (Muthoot Vehicle and Asset Finance Limited) या संस्थेवर मोठी कारवाई केली आहे. या कंपनीचं सर्टिफिकेट ऑफ ऑथोरीटी (Certificate of Authorisation) म्हणजेच अधिकृत असल्याचं प्रमाणपत्र रद्द केलंय. फक्त मुथुट वेईकलच नाही, तर मुथुटसह ईको इंडिया फायनानशियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (Eko India Financial Services Ltd.) या कंपनीवर देखील कारवाई केली आहे. एकाच वेळी दोन मोठ्या फायनान्स कंपन्यांवर आरबीआयनं मोठी कारवाई करत त्यांचं लायसन्स रद्द केलंय.
PSO आणि अधिकृत परवान्यासाठी आवश्यक असेलल्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च बँक असलेल्या आरबीआयनं अखेर एक नोटीस जारी करत या दोन्ही फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. परवाने रद्द केल्यामुळे आता या कंपन्या अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
अडचणी वाढणार
सर्टिफिकेट ऑफ ऑथोरायझेशन म्हणजे अधिकृत असल्याचं प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे आता या कंपन्यांच्या आता आर्थिक व्यवहारांवर बंधनं घालण्यात आली आहे. दरम्यान, या कंपनीच्या ग्राहकांना किंवा व्यापाऱ्यांना तीन वर्षांच्या मुदतीत आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी संपर्क करता येऊ शकेल, असंही आरबीआयनं जारी केलेल्या नोटिशीत म्हटलंय.
Reserve Bank of India cancels the Certificate of Authorisation (CoA) of Payment System Operators (PSOs) Muthoot Vehicle and Asset Finance Limited and Eko India Financial Services Ltd. pic.twitter.com/B3f739BWmz
— ANI (@ANI) January 4, 2022
1992 साली मुथुट ग्रूपतर्फे मुथुट वेईकल फायनान्स ही कंपनी सुरु कऱण्यात आली आहे. सुरवातीला या कंपनीचं नाव मुथुट लिजींग एन्ड फायन्सान्स लिमिटेड (Muthoot Leasing and Finance Ltd) असं होतं. 2008 साली हे हे नाव बदलूल मुथुट वेईकल एन्ड ऍसेट फायनान्स लिमिटेड (Muthoot Vehicle & Asset Finance Ltd (MVFL) असं करण्यात आलं होतं. मुथुट वेईकलल्या देशभरात साडे चार हजारहून अधिक शाखा आहेत. दरम्यान, आरबीआयनं केलेल्या कारवाईमुळे मुथुटच्या प्रतिष्ठेलाही धोका पोहोचण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
अमिताभ बच्चन यांची जाहिरात
मुथुट वेईकल आणि एसेट फायनान्स लिमिटेड या कंपनीची अधिकृत वेबसाईवरील जाहिरातीत अमिताभ बच्चन दिसून आले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सेवा, सुविधांसाठी मुथुट ग्रूप ओळखला जातो. कर्ज, ठेवी, इत्यादींसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुथुट ग्रूपच्या मुथुट वेईकल एन्ट एसेट फायनान्स लिमिटेड या कंपनीला आता उतरती कळा लागली असल्याची चर्चा रंगली आहे.
इतर बातम्या –
KDMC: कल्याण-डोंबिवलीत लसीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेना आमने-सामने