TMC च्या महिला खासदाराचा पदाचा राजीनामा, पक्षातूनच झाले गंभीर आरोप

महिला खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या प्रमुखांकडे सोपवला आहे. २०१९ मध्ये मोदी लाटेतही मिमी यांनी २ लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. पण आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

TMC च्या महिला खासदाराचा पदाचा राजीनामा, पक्षातूनच झाले गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 5:22 PM

TMC MP Resigns : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मिमी चक्रवर्ती यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द केला. अभिनेत्री आणि खासदार असलेल्या मिनी चक्रवर्ती यांनी यावेळी टीएमसीच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचं कारण देत राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिमी चक्रवर्ती या जाधवपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

मिमी चक्रवर्ती यांनी सांगितले की, त्या गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे अजून राजीनामा सादर केलेला नाही.

कोण आहेत मिमी चक्रवर्ती?

मिमी चक्रवर्ती यांनी अनेक बंगाली सिनेमांमध्ये काम केले आहे. मिमी चक्रवर्ती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1989 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. मिमी चक्रवर्तीने 2012 मध्ये चॅम्पियन या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बंगाली इंडस्ट्रीत त्यांनी 25 हून अधिक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. त्यामुळेच मिमी यांची लोकप्रियता पाहून टीएमसीने  त्यांना 2019 मध्ये उमेदवार निवडणुकीचे तिकीट दिले होते.

2 लाख 95 हजार मतांच्या फरकाने विजय

अनुपम हाजरा या भाजप उमेदवारांने मिमी चक्रवर्ती यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण मिमी चक्रवर्ती यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचा विजय झाला. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने निवडणुकीत चांगली कामगिरी करत पुन्हा सत्ता काबिज केली होती. भाजप नेते अनुपम हाजरा यांचा सुमारे 2 लाख 95 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

कोणी केले गंभीर आरोप

पश्चिम बंगाल सरकारमधील राज्यमंत्री श्रीकांत महतो यांनीच खासदार मिर्मी चक्रवर्ती आणि इतर बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. मिमी चक्रवर्ती, जून मालिया, सयानी घोष, सायंतिका बॅनर्जी, नुसरत जहाँ यांसारखे नेते पैसे लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पैसे लुटून हे नेते पक्षाची संपत्ती बनत असतील तर आम्हाला मंत्री राहायचे नाही, असे ते म्हणाले होते. या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री चोर असल्याचे लोक म्हणत आहेत. पक्ष त्या चोरांचेच ऐकेल. नवीन मार्ग शोधावे लागतील. या विरोधात आंदोलन उभे करावे लागेल. असं देखील श्रीकांत महतो म्हणाले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.