jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार: दंगलखोरांनी दुकानांची तोडफोड केली, पुरावे नष्ट करण्यासाठी CCTV वायर तोडली
jahangirpuri Violence : काल देशात हनुमान जयंती जोरदार करण्यात आली. देशाच सर्वत्र भक्तीभावाचे वातावरण होते. सगळीकडे वातावरण चांगले असतानाच मात्र देशाची राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशीच दोन समाजात दगंल माजली होती. दिल्लीतील जहांगीरपुरीत (Jahangirpuri) हनुमान जयंती दिवशी हिंसाचार (violence) झाला. त्यामुळे देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. तर याघटनेमुळे अख्या देशातील सुरक्षा यंत्रणा […]
jahangirpuri Violence : काल देशात हनुमान जयंती जोरदार करण्यात आली. देशाच सर्वत्र भक्तीभावाचे वातावरण होते. सगळीकडे वातावरण चांगले असतानाच मात्र देशाची राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशीच दोन समाजात दगंल माजली होती. दिल्लीतील जहांगीरपुरीत (Jahangirpuri) हनुमान जयंती दिवशी हिंसाचार (violence) झाला. त्यामुळे देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. तर याघटनेमुळे अख्या देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट झाल्या असून प्रत्येक राज्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांना (Delhi Police) रस्त्यावर उतरवले आहे. तर दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत झालेल्या गोंधळात दोन्ही गट आमनेसामने आल्याने एकमेकांवर निशाणा साधत विटा आणि दगडांचा मारा करण्यात आला. तर दंगलखोर जमावाने पोलिसांनाही सोडले नाही. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तर या घटनेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र या गोंधळाचा फायदा काही चोरट्यांनी मात्र तेथे लुटमार केल्याचे आता उघड झाले आहे. तसेच घटनेचा पुरावा नष्ट करण्यासाठी रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्याची वायरही कापून टाकण्यात आल्या आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायरही तोडल्या
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात शनिवारी संध्याकाळी दोन गटात हिंसाचार झाला. यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी सायंकाळी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या वादात चोरट्यांनी केवळ दुकानांचीच तोडफोड केली. तर दुकानेही लुटली. इतकेच काय तर घटनेचा पुरावा पुसण्यासाठी रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायरही कापल्या. या परिसरात किराणा मालाचे दुकान चालवणारे पिता-पुत्र सुरेश गर्ग आणि संदीप यांनी आपबीती सांगितली. ते म्हणाले, अचानक झालेल्या गोंधळात मी आणि माझा मुलगा आपला जीव वाचवण्यासाठी दुकानात लपून बसलो. मात्र चोरट्यांनी त्यांच्या काउंटरमध्ये ठेवलेले सुमारे 20 हजार रुपये लुटले. तसेच दुकानाची नासधुस देखील केली. दुकानातील काऊंटर उलथून टाकले. त्याचबरोबर त्या जमावाने इतर दुकानेही लुटली, असा दावा ही सुरेश यांनी केला आहे. त्या हिंसाचारावर बोलताना मुलगा संदीप म्हणाला, त्यांना पेमेंट करायचे होते. त्यासाठी त्यांनी बँकेतून ते पैसे आणले होते. पोलीस बंदोबस्त तैनात करूनही कुटुंबे दहशतीखाली होती. कोणाचेच दुकान उघडण्याचे धाडस होत नव्हते. अनेकांनी त्यांची दुकाने ही बंद ठेवली होती. दरम्यान रविवारी सकाळी या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कुशल सिनेमासमोर हाणामारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजता झालेल्या हिंसाचारात दगडफेक करण्यात आली. काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली. त्यानंतर हिंसाचारग्रस्त जहांगीरपुरीसह इतर संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर लावण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसचे जनसंपर्क अधिकारी अनयेश रॉय यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीला काढलेली ही पारंपारिक मिरवणूक होती. दरम्यान ही मिरवणूक कुशल सिनेमाजवळ पोहोचली तेव्हा दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेकही झाली.
अनेक पोलीस जखमी
दिल्लीतील जहांगीरपुरीत हनुमान जयंती दिवशी मिरवणुकीत बंदोबस्तासाठी पोलिस होते. त्यांनी त्या वेळी झालेल्या वादाला तोंड फुटण्याआधी हस्तक्षेप करत वाद मिटवला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र अचानक दगडफेक झाली आणि काही पोलीस जखमी झाले. सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रॉय यांनी सांगितले. सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. हा परिसर संवेदनशील असल्याने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर बातम्या :