ऋषी सुनक यांनी या गोष्टींमधून जिंकलं भारतीयांचं मन, G20 मध्ये पाहायला मिळाली क्रेझ

| Updated on: Sep 10, 2023 | 4:42 PM

G-20 Summit : भारतात झालेल्या जी-२० संमेलनासाठी अनेक दिग्गज नेते भारतात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे स्वागत केले. जागतिक नेत्यांपैकी ऋषी सुनक हे भारतात सर्वाधिक चर्चेत राहिले.

ऋषी सुनक यांनी या गोष्टींमधून जिंकलं भारतीयांचं मन, G20 मध्ये पाहायला मिळाली क्रेझ
Follow us on

G-20 Summit : देशात पार पडलेल्या G20 बैठकीत जगातील शक्तिशाली देशांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ते ऋषी सुनक या सर्व नेत्यांनी भारतीय संस्कृती आणि भारतातील विकास अनुभवला. यावेळी दिल्ली विमानतळावर उतरण्यापासून ते अक्षरधाम मंदिराला भेट देण्यापर्यंत आणि शनिवारी रात्री झालेल्या भव्य डिनरपासून ते राजघाटावर ऋषी सुनक यांनी ज्या प्रकारे स्वत:ला सादर केले, ते भारतासोबतच्या त्यांच्या भावी संबंधांबद्दलही सांगते.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतातील अनेक गोष्टींना मान सन्मान दिला. ज्याचे आता भरपूर कौतुक होत आहे. G20 मध्ये ऋषी सुनक यांची क्रेझ पाहायला मिळाली.  मोदी सरकारमधील मंत्रीही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटण्यासाठी आतुर होते. ऋषी सुनक यांच्यात देखील भारतीय परंपरा आणि संस्कृती बद्दल असलेला आदर पाहायला मिळाला.

ऋषी सुनक यांची देहबोली खूप वेगळी होती. शनिवारी भारत मंडपममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतादरम्यान ऋषी सुनक स्वतः ज्या पद्धतीने मोठ्याने बोलले आणि सर्वात जास्त वेळ उभे राहिले, त्यावरून ब्रिटनचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता कसा आहे ते दिसतेय.  ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध आणखी चांगले होतील असं मानलं जात होतं. पण जी २० नंतर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

ऋषी सुनक हे मोठ्या कार्यक्रमात आणि व्यासपीठांवर स्वतःला मनापासून हिंदू मानतात आणि कोणताही भारतीय कुठेही स्वत:ला प्रेझेंट करतो त्याच पद्धतीने स्वतःला सादर करतो. त्यांची पत्नी देखील भारतीय आहे.


ऋषी सुनक यांनी रविवारी पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी हिंदूप्रमाणे पूजा केली आणि अनवाणी पायी चालत राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच ऋषी सुनक यांनीही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात मोठे स्थान निर्माण केले.

ब्रिटनमध्ये मुरारी बापूंच्या कथेला जाऊन जय सियाराम म्हणत ऋषी सुनक यांनी स्वत:ला अभिमानी हिंदू म्हणून कसे सादर केले होते, हे लक्षात येते. आता दिल्लीत आल्यावर त्यांनी अक्षरधाम मंदिरात जाऊन प्रार्थना करून भारताशी मजबूत नातेसंबंधाचा पाया रचला आहे. त्यामुळे भारतात आलेल्या नेत्यांपैकी ऋषी सुनक हे सर्वाधिक चर्चेत राहिले.