देशात ओमिक्रॉनचे वाढते आकडे, पंतप्रधान मोदींची आज हायलेव्हल बैठक, देश पुन्हा लॉकडाऊनकडे जातोय?
त्यामुळे दोन्ही डोसचं शंभर टक्के लसीकरण आणि ज्यांचे दोन्ही डोस झालेत त्यांना बुस्टर डोस दिला जावा अशी मागणी जाणकार करतायत. आजच्या बैठकीत त्याच्या शक्यतेवरही चर्चा होऊ शकते.
गेल्या काही दिवसात देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. सध्यस्थितीत महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 65 वर पोहोचलीय तर देशातल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ही 248 वर गेलीय. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा तिप्पट वेगानं पसरतो. यूरोप अमेरीका, आफ्रिकेत सध्या ओमिक्रॉननं थैमान घातलंय. भारतातही अशी स्थिती होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर काय उपाय योजना कराव्यात, सध्याची नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi High Level Meeting Today) यांनी एका हायलेव्हल बैठकींचं आयोजन केलंय. ह्यात टॉपचे अधिकारी, काही मंत्री सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या ह्या बैठकीनंतर राज्यांना नवे दिशा निर्देश दिले जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय.
सध्याची काय स्थिती? सध्या महाराष्ट्र, केरळ, दिल्लीसह 16 राज्यात ओमिक्रॉनचे 248 रुग्ण सापडलेले आहेत. पण ही संख्या झपाट्यानं वाढतेय. महाराष्ट्रात एकाच दिवशी 11 रुग्ण सापडले होते. एकूण आकडा हा 65 वर आहे. तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल असही आरोग्य मंत्री टोपेंनी म्हटलेलं आहे. पण ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली, त्यातले 90 टक्के रुग्ण बरेही झालेले आहेत. यूरोप, अमेरीकेत एका दिवसात लागण होण्याचं प्रमाण तिप्पट आहे. तशीच स्थिती आपल्याकडेही होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे दोन्ही डोसचं शंभर टक्के लसीकरण आणि ज्यांचे दोन्ही डोस झालेत त्यांना बुस्टर डोस दिला जावा अशी मागणी जाणकार करतायत. आजच्या बैठकीत त्याच्या शक्यतेवरही चर्चा होऊ शकते.
सध्या कुठले निर्बंध? जवळपास 16 राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. त्यामुळेच विविध राज्यांनी लाट रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केलीय. त्यात केंद्रानं ज्या सुचना दिलेल्या आहेत, त्याचं पालन केलं जातंय. त्यात नाईट कर्फ्यू लावला जावा, वॉर रुमची निर्मिती पुन्हा करावी, कोविडचे आतापर्यंत जे नियम सांगितले गेलेत, त्याची पुर्तता करावीत असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, ओडिशा, राजस्थान, आंध्र प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. दिल्लीत ख्रिसमस सेलिब्रेशन, नव वर्षाच्या पार्ट्या, तसच सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणली गेलीय. हरियाणात बस, रेल्वे प्रवास, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करायचा तर लसीचे दोन डोस अनिवार्य आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर देश पुन्हा लॉकडाऊनकडे तर जात नाही ना अशी चर्चा सुरु झालीय.
हे सुद्धा वाचा:
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक
धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप, शिवसेनेची नितेश राणेंविरोधात पोलिसात तक्रार
Pimpri Murder | पिंपरीत अकरावीतील विद्यार्थ्याची हत्या, बंद पडलेल्या कारखान्याजवळ मृतदेह आढळला