राम मंदिरासाठी पाकिस्तान आणि इराण या मुस्लीम देशांमधून आली ही खास गोष्ट

| Updated on: Jan 03, 2024 | 6:13 PM

Ram Mandir Update : राम मंदिरासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येत राम मंदिरासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारीला मुर्ती

राम मंदिरासाठी पाकिस्तान आणि इराण या मुस्लीम देशांमधून आली ही खास गोष्ट
ram mandir
Follow us on

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत श्री रामांचे आगमन होणार आहे अशी सर्व भारतीयांची मान्यता आहे. कारण अनेक वर्षानंतर येथे मंदिर बनत आहे. राम मंदिरासाठी रामललाची मूर्ती निश्चित झाली असली तरी ती १७ तारखेला सार्वजनिक केली जाणार आहे. या वेळी अयोध्येत मिरवणूक काढण्यात येणार आहे. देशभरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाची उत्सूकता दिसते आहे. अयोध्येतील राम लल्लाच्या अभिषेकसाठी मुघल शासक बाबरचे जन्मस्थान उझबेकिस्तानमधून देखील पाणी आणले गेले आहे. पाकिस्तान, चीन, दुबई तसेच अंटार्क्टिकाच्या पाण्यातून श्री रामाचा अभिषेक केला जाईल.

जगभरातील नद्यांचे पाणी

या वर्षी एप्रिलमध्ये दिल्लीतील भाजपचे माजी आमदार विजय जॉली यांनी 155 देशांमधून आणलेल्या पवित्र पाण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. हे ऐतिहासिक असल्याचे गडकरी म्हणाले होते. कलश जवळून पाहिल्यास चीन, लाओस, लाटविया, म्यानमार, मंगोलिया, सायबेरिया, दक्षिण कोरिया इत्यादी अनेक देशांच्या नावांचे स्टिकर्स दिसतील.

156 देशांमधून पाणी संकलन

एकूण 156 देशांमधून सर्व धर्माच्या लोकांनी पाणी संकलनात सहकार्य केल्याचा दावा विजय जौली यांनी केला आहे. हिंदूंनी सौदी अरेबियातून तर मुस्लीम महिलांनी इराणमधून पाणी पाठवले आहे. ताज मोहम्मदने कझाकस्तानमधून तेथील मुख्य नदीचे पाणी पाठवले. शीख बांधवांच्या मदतीने केनियातून पाणी गोळा करण्यात आले. अत्यंत काळजी घेत सिंधींनी पाकिस्तानातून अयोध्येला पाणी पाठवले आहे.

हे सुद्धा वाचा

जौली यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी पाण्याने भरलेला एक मोठा कलश विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक मंडळ सदस्य दिनेश चंद्र यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात या पाण्याचा वापर केला जाणार आहे.