Punjab National Bank : उत्तर प्रदेशात पंजाब नॅशनल बँकेवर जबरी दरोडा; रिव्हॉल्व्हरच्या धाकाने 10 लाख लुटले

पोलिसांनी सांगितले की, पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत दुपारी 1.20 च्या सुमारास चार दरोडेखोर घुसले. त्यातील तिघांनी हेल्मेट घातले होते तर एकाने मास्क घातला होता. बँक कर्मचाऱ्यांना त्यांचा चेहरा पूर्णपणे दिसू शकला नाही. त्यामुळे फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेणे व त्यांची ओळख पटवणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले आहे.

Punjab National Bank : उत्तर प्रदेशात पंजाब नॅशनल बँकेवर जबरी दरोडा; रिव्हॉल्व्हरच्या धाकाने 10 लाख लुटले
उत्तर प्रदेशात पंजाब नॅशनल बँकेवर जबरी दरोडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 6:23 PM

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आलेले योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याची सुरुवात म्हणून त्यांनी गुन्हेगारीवर अंकुश ठेवू न शकलेल्या पोलिसांना निशाण्यावर घेतले आहे. याच मोहिमेंतर्गत दोन दिवसांपूर्वी एसएसपीला निलंबित करण्यात आले. त्यामुळे भ्रष्ट पोलिसांसह गुन्हेगारांनाही जरब बसण्याची आशा होती. मात्र गाझियाबादमध्ये पंजाब नॅशनल बँके (Punjab National Bank)वर पडलेल्या जबरी दरोड्याने त्या आशेला सुरुंग लावला आहे. दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरच्या धाकाने बंधक बनवून बँकेतील जवळपास 10 लाखांचा ऐवज लुट (Loot)ल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे जनतेत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Robbery at Punjab National Bank in Uttar Pradesh 10 lakh looted by revolver)

मास्क घालून आले होते दरोडेखोर; दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने बँक कर्मचारी हादरले

दिवसाढवळ्या नूरनगर सिहानी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत शनिवारी ही जबरी दरोड्याची धक्कादायक घटना घडली. बँकेच्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बंधक बनवण्यात आले. बँक कर्मचारी पुरते हादरून गेल्यानंतर त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेत दरोडेखोरांनी बँकेतील सुमारे 10 लाखांचा मौल्यवान ऐवज लुटला. मिळालेल्या माहितीनुसार, आज मास्क घातलेल्या चार दरोडेखोरांनी पीएनबी बँकेच्या नूरनगर सिहानी शाखेत घुसून रिव्हॉल्वरच्या धाकाने दरोडा टाकला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. संबंधित बँकेची शाखा सील करण्यात आली असून पोलिसांकडून बोटांचे ठसेही घेतले जात आहेत.

तीन दरोडेखोरांनी हेल्मेट घातल्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान

पोलिसांनी सांगितले की, पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत दुपारी 1.20 च्या सुमारास चार दरोडेखोर घुसले. त्यातील तिघांनी हेल्मेट घातले होते तर एकाने मास्क घातला होता. बँक कर्मचाऱ्यांना त्यांचा चेहरा पूर्णपणे दिसू शकला नाही. त्यामुळे फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेणे व त्यांची ओळख पटवणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले आहे. बाईक चालू करून चारही चोरटे बँकेत घुसले होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनेच्या वेळी व्यवस्थापकासह तीन बँक कर्मचारी बँकेत उपस्थित होते.

वाढत्या गुन्हेगारीमुळे आदल्या दिवशीच नवीन एसएसपीची नियुक्ती

गाझियाबादमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार आयपीएस अधिकारी एलआर कुमार यांना गाझियाबादमध्ये तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या ते दक्षता विभागात उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून कार्यरत आहेत. गाझियाबादमध्ये कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत ते तिथेच राहून डीआयजी/एसएसपीची जबाबदारी सांभाळणार आहेत. गाझियाबादमध्ये वाढती गुन्हेगारी आणि कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी एसएसपी पवन कुमार यांना निलंबित केले होते. (Robbery at Punjab National Bank in Uttar Pradesh 10 lakh looted by revolver)

इतर बातम्या

Harsh Sanghvi: बलात्काराला मोबाईल फोन जबाबदार; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

VIDEO : अमरावतीत दोन गटात तुफान राडा, हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.