Rahul Gandhi | ‘ऑलिम्पिक कुस्तीपटूंना खोलीत बोलवून तो….’, राहुल गांधीच्या ‘Flying Kiss’ वरुन आर-पारची लढाई
Rahul Gandhi | बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूर मुद्यावरुन संसदेत भाषण केलं. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांना लगेचच स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं.
नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी सभागृहाच्या बाहेर जाताना फ्लाईंग किसने इशारा केला, असा स्मृती इरानी यांचा आरोप आहे. स्मृती इरानी यांच्या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या भाजप-काँग्रेसमध्ये आरो-प्रत्यारोप सुरु आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘कमरेत हात घातला’
स्वाती मालिवाल यांनी टि्वट करत मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. “हवेत फेकलेल्या एका कथित फ्लाईंग किसने इतकी आग लागली आहे. पण दोन रांगा मागेच एक व्यक्ती बृजभूषण बसलाय. त्याने ऑलिम्पिक कुस्तीपटूंना खोलीत बोलवून त्यांच्या छातीवर हात ठेवला. कमरेत हात घातला. त्यांच लैंगिक शोषण केलं होतं. त्याने जे केलं त्यावर राग का येत नाही?” असं स्वाती मालिवाल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
हवा में फेंकी हुई एक कथित flying kiss से इतनी आग लग गई। 2 row पीछे एक आदमी बृजभूषण बैठा हुआ है। जिसने ओलम्पियन पहलवानों को कमरे में बुलाके छाती पे हाथ रखा, कमर पे हाथ रखा और यौन शोषण किया। उसके करे हुए पे ग़ुस्सा क्यों नहीं आता?
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) August 9, 2023
म्हणूनच मोदी सरकारवर निशाणा
बृजभूषण शरण सिंह भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बृजभूषण शरण सिंह सभागृहात उपस्थित होता. महिला कुस्तीपटूंच लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. म्हणूनच स्वाती मालिवाल यांनी बृजभूषणच्या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधलाय. किती खासदारांनी राहुल गांधींवर कारवाईची मागणी केलीय?
बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूर मुद्यावरुन संसदेत भाषण केलं. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांना लगेचच स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं. या दरम्यान स्मृती इराणी यांनी आरोप केलाय की, राहुल गांधी सभागृहाबाहेर जात असताना, ट्रेजरी बेंचकडे फ्लाईग किसचा इशारा केला. राहुल गांधी यांच हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं नाही. पण दोन डझन महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून त्यांच्याकडे राहुल गांधी यांची तक्रार केली आहे. वायनाडमधून खासदार असलेल्या राहुल गांधींवर कारवाईची मागणी केली आहे.