मोहन भागवत म्हणतात, सर्व भारतीयांचा DNA एकच; मुसलमानांना सीएएवर आक्षेप नाही

सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी सीएए कायद्याला एकाही मुस्लिम व्यक्तिचा विरोध नसल्याचं विधान केलं आहे. (RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

मोहन भागवत म्हणतात, सर्व भारतीयांचा DNA एकच; मुसलमानांना सीएएवर आक्षेप नाही
मोहन भागवत यांनी 10 लाख तरुणांना संबोधित केलं
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 5:50 PM

गुवाहाटी: सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी सीएए कायद्याला एकाही मुस्लिम व्यक्तिचा विरोध नसल्याचं विधान केलं आहे. सीएए आणि एनआरसीमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ राजकीय लाभासाठी याला जातीय रंग दिला जात आहे, असा दावा मोहन भागवत यांनी केला. (RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

मोहन भागवत मंगळवारी संध्याकाळी आसामच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आसाममधील विविध भागांना भेटी देणार आहेत. त्यानंतर आसामसह अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा सारख्या पूर्वेकडील राज्यांमधील संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. कोरोना महामारी, समाज आणि लोकांच्या विकासाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर ते गुवाहाटी येथे बोलत होते.

वैविध्यतेला आक्षेप नाही

चार हजार वर्षांपासूनचा आपला इतिहास आहे. आपल्याकडे असलेली विविधतेत एकता कुठेही पाहायला मिळत नाही. एवढं वैविध्य असूनही सर्वजण शांततेत राहत आहेत. एक समान होण्यासाठी सर्व गोष्टी समान असाव्यात असा विचार करणारे लोक आल्याने विभिन्नता निर्माण झाली. आमचा कोणत्याही विविधतेला आक्षेप नाही. आपल्या देशात किती वेगवेगळे राज्य होते. तरीही लोक काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत येतजात होते, असं त्यांनी सांगितलं.

लोकसंख्या वाढवण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न

एकच ईश्वर हवा, एकच आचार पद्धती असावी, असं ज्यावेळी बोलल्या जाऊ लागलं तेव्हा या समस्यांशी आमचा थेट सामना झाला. 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढवण्याची मोहीम सुरू झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली हे आंशिक सत्य आहे. पण आसाम मिळाला नाही. बंगाल मिळाला नाही. कॉरिडोर मिळाला नाही. मग जे मिळालं ते मिळालं असं ठरवलं आणि बाकी काय मिळतंय त्याकडे लक्ष दिलं गेलं. काही लोक लोक त्रासून इथे येत होते. तर काही लोक केवल लोकसंख्या वाढवण्यासाठी आले. त्यांना मदतही मिळाली. त्यातून ज्या भूभागावर आम्ही असू तिथे सर्व काही आमच्याच हिशोबाने चालेल, असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असंही त्यांनी सांगितलं. (RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

संबंधित बातम्या:

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, काँग्रेसचा मोठा आरोप

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार?; शिवसेना खासदार घेणार पंतप्रधानांची भेट

आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा, मराठा आरक्षणावर दानवेंचं कोचिंग करू; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

(RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.