RTGS सुविधेत ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या ग्राहकांना कसा मिळणार फायदा?

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ही सुविधा मोठ्या रक्कमेच्या हस्तांतरणासाठी वापरली जाते. | RTGS 24x7

RTGS सुविधेत 'हा' मोठा बदल; जाणून घ्या ग्राहकांना कसा मिळणार फायदा?
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 9:28 AM

नवी दिल्ली: येत्या सोमवारपासून रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधेसाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार आता ही सुविधा 24×7 उपलब्ध असेल. अशाप्रकारची सुविधा पुरवणारा भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे. 13 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून भारतात ही सुविधा सुरु होईल. (RTGS to be available 24x7x365 from Dec 2020)

भारतीय रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच RTGS सुविधा 24 तास पुरवण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून एनईएफटी (NEFT) सुविधा 24×7 सुरु करण्यात आली होती.

भारतात RTGS सेवा कधी सुरु झाली?

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ही सुविधा मोठ्या रक्कमेच्या हस्तांतरणासाठी वापरली जाते. एनईएफटीच्या माध्यमातून 2 लाख रूपये हस्तांतरित केले जाऊ शकतात. भारतात 26 मार्च 2004 रोजी RTGS सुविधेची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळात देशातील चार बँकाकडूनच ही सुविधा पुरवली जात होती. किमान दोन लाखांच्या व्यवहारासाठी ही सुविधा वापरली जाते. तर कमाल रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही. सध्याच्या घडीला देशातील 237 बँकांमध्ये RTGS सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून दिवसाला तब्बल 4.17 लाख कोटींचे व्यवहार होतात.

आरटीजीएस म्हणजे काय?

सामान्य ग्राहकांना जेव्हा बँकेतून पैसे हस्तांरित (Transfer) करायचे असतात तेव्हा त्यांना फॉर्म भरावा लागतो. त्यांनंतर काऊंटरवर हा फॉर्म तपासला जातो. त्यानंतर आपण दिलेले पैसे बँक कर्मचारी संबंधित खात्यात जमा करतात. या कामासाठी बराच वेळ लागतो.

मात्र, आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे २ लाख रुपये हस्तांतरित करता येऊ शकतात.

गेल्यावर्षीच्या जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने RTGS आणि NEFT हे दोन्ही व्यवहार निशुल्क केले होते. यापूर्वी फक्त NEFT ही सुविधा 24*7 उपलब्ध होती. एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात.

संबंधित बातम्या:

पोस्टात खाते असल्यास तातडीने हे काम करा! अन्यथा मोठं नुकसान

नियम बदलले! ‘या’ दोन बँकांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आता OTP ची गरज

मोठी बातमी! HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही, RBIचे निर्बंध

(RTGS to be available 24x7x365 from Dec 2020)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.