भारताचा जेम्स बॉन्ड शांतीदूत बनणार, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची मोदींनी दिली जबाबदारी

अजित डोभाल यांच्यासोबत चीनचे वांग यी सुद्धा या चर्चेत भाग घेणार आहेत. वांग यी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे राईट हँड आहेत. 10-11 सप्टेंबर रोजी अजित डोभाल आणि वांय यी रशिया दौऱ्यावर आहेत. मॉस्कोमध्ये होणाऱ्या ब्रिक्स संमेलनात ते सहभागी होणार आहेत.

भारताचा जेम्स बॉन्ड शांतीदूत बनणार, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची मोदींनी दिली जबाबदारी
ajit doval
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 11:47 AM

Russia-Ukraine war: भारताचे अनेक अवघड मिशन लिलया पार पाडणारे, भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून ओळख असणारे व्यक्ती म्हणजे अजित डोभाल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोभाल यांच्यावर महत्वाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवली आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची ‘सिक्रेट’ जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचे वृत्त आहे. त्यासाठी या आठवड्यात अजित डोभाल रशिया दौऱ्यावर जात आहेत. यामुळे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सुरु असलेले हे युद्ध थांबवण्याची आशा निर्माण झाली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादिमिर पुतिन यांनी रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले होते. त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही युद्ध थांबवण्यासाठी भारताकडून अपेक्षा व्यक्त केली होती. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही शांती वार्तासाठी भारत अन् चीन यांनी मध्यस्थी करावी, अशी भूमिका घेतली. यामुळे आता भारत शांतीदूत म्हणून आपला भूमिका बजावण्यास शक्य आहे.

926 दिवसांपासून युद्ध

रशिया आणि युक्रेनमध्ये 926 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. 2021 पासूनच रशियाने या युद्धाची तयारी केली होती. जगाची अपेक्षा आता भारताकडे लागली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकटमोचक आणि भारताचे जेम्स बॉन्ड असलेल्या अजित डोभाल यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. त्यासाठी अजित डोभाल रशिया दौऱ्यावर जात आहेत. त्या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी ते महत्वाची भूमिका बजावणार आहे.

हे सुद्धा वाचा

अजित डोभाल 10-11 सप्टेंबर रोजी मास्कोत

अजित डोभाल यांच्यासोबत चीनचे वांग यी सुद्धा या चर्चेत भाग घेणार आहेत. वांग यी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे राईट हँड आहेत. 10-11 सप्टेंबर रोजी अजित डोभाल आणि वांय यी रशिया दौऱ्यावर आहेत. मॉस्कोमध्ये होणाऱ्या ब्रिक्स संमेलनात ते सहभागी होणार आहेत. अजित डोभाल रशियातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांत शांतता निर्माण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर ही चर्चा होणार आहेत. यामुळे जगाच्या नजरा या चर्चेकडे लागल्या आहेत.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.