Russia Ukraine War : ऐकावं ते नवलच, इकडं उत्तर प्रदेशात गावची सरपंच तर यूक्रेनमध्ये एमबीबीएसची विद्यार्थीनी, यंत्रणाही गडबडली!

रशिया आणि यूक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी यूक्रेनमध्ये गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा हाती घेतलंय. अशावेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

Russia Ukraine War : ऐकावं ते नवलच, इकडं उत्तर प्रदेशात गावची सरपंच तर यूक्रेनमध्ये एमबीबीएसची विद्यार्थीनी, यंत्रणाही गडबडली!
वैशाली यादव ही विद्यार्थिनी सरपंच असूनही यूक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेली कशी?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 8:58 PM

मुंबई : रशिया आणि यूक्रेनच्या युद्धानं (Russia Ukraine War) आता भीषण स्वरुप घेतलंय. अशावेळी यूक्रेनमध्ये अडकून पडलेल्या एका विद्यार्थिनीचा व्हिडओ समोर आलाय. महत्वाची बाब म्हणजे ही विद्यार्थिनी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हरदोई जिल्ह्यातील एका गावची सरपंच आहे. ही विद्यार्थिनी यूक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता हरदोई प्रशासनानं या विद्यार्थिनीच्या खात्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच एका गावची सरपंच असताना ही विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical Education) यूक्रेनमध्ये कशी गेली याचा तपासही केला जाणार आहे.

रशिया आणि यूक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी यूक्रेनमध्ये गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा हाती घेतलंय. अशावेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये यूक्रेनमध्ये अडकलेली एक विद्यार्थिनी भारतीय दूतावासाकडे मदतीची याचना करत आहे. त्यानंतर माहिती मिळाली की ती विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आहे आणि ती विद्यमान सरपंच आहे. या विद्यार्थिनीचं नाव वैशाली यादव असून ती सध्या यूक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतेय.

निवडणुकीसाठी गावात आली, सरपंच झाली आणि यूक्रेनला गेली!

वैशाली ही ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान गावात आली होती. तिने सरपंचपदाची निवडणूकही जिंकली. तिचे वडील महेंद्र यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत, तसंच ते माजी ब्लॉक प्रमुखही होते. हरदोई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीरा अग्रवाल यांनी सांगितलं की, वैशाली ही सांडी ब्लॉकच्या तेरौपुरसेली गावाची सरपंच आहे. तिचे वडील कामकाज पाहतात!

सरपंच असताना वैशाली यूक्रेनला गेली कशी?

हरदोईच्या सीडीओ आकांक्षा राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली नावाची विद्यार्थिनी एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी यूक्रेनला गेली आहे. ती हरदोईची रहिवासी असून तेरा पुरसैलीगावची सरपंच आहे. वैशाली मागील वर्षी उत्तर प्रदेशातील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान गावात आली होती. ती यूक्रेनच्या खार्किवमध्ये एका विद्यापीठात एमबीबीएस करत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सरपंच असताना वैशाली यूक्रेनला कशी गेली? तिच्या खात्यांची चौकशी केली जातेय. ते खातं कुणाकडून चालवलं जात आहे? याची माहिती घेतली जात असून सध्या हे खातं सीज करण्यात आल्याचं आकांक्षा राणा यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : भारताला मिळणाऱ्या शक्तीशाली ब्रम्हास्त्राला अमेरिकेचा खोडा? कसं आहे s-400 मिसाईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा वादाचा ठरणार? काँग्रेस नेते काळे झेंडे दाखवणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.