Russia Ukraine War : युद्ध सुरू करणं कठीण, काय मिळालं युद्धातून? पुतीन यांच्याकडून ऐका
दहा दिवसांनी पुतीन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियावर निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. युक्रेनला बर्बाद करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे वक्तव्य आज पुतीन यांनी केले आहे.
नवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घमासान युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन (Vladimir Putin) काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियावर निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. युक्रेनला बर्बाद (Russia Ukraine Crisis) करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे वक्तव्य आज पुतीन यांनी केले आहे. सैनिकांच्या मुख्य ठिकाणांना पुतीन यांनी टार्गेट करून संपल्याचे यावेळी सांगितलं आहे. युक्रेनमधील रशिय सैन्य सध्या हाय अलर्टवर असल्याचेही पुतीन यांनी यावेळी सांगितले आहे. ब्रिटेनच्या मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सैनिकांना हाय अलर्टवर ठेवल्याचे सागण्यात येत आहे. हे युद्ध सुरू करणे हा आमच्यासाठी कठीण निर्णय होता, असेही ते म्हणाले आहेत.
शहर दिल्यास शांतता प्रस्थापित होईल
डोनवॉत्सक शहर रशियाला दिल्यास शांतता प्रस्थापित होईल. 2013 पासून या शहरात 13 ते 14 हजार नागरिक मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत. आज काहीशी शांतता प्रस्थापित होत असली तरी रशियन सैन्याकडून काही ठिकाणी फायरिंग होत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. विमान पाडल्याच्याही काही बातम्या समोर आल्या आहेत. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच पुतीन यांचे हे वक्तव्य समोर आल्याने युक्रेनचे टेन्शन पुन्हा वाढले आहे.
पुतीन काय म्हणाले?
दहा दिवसांनंतर पुतीन बोलले, रशियावर निर्बंध लादणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे, असे वक्तव्य पुतीन यांनी केले आहे. #VladimirPutin #RussianUkrainianWar #VolodymyrZelenskyy pic.twitter.com/qn11fE2r2W
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2022
युक्रेनची कडवी झुंज
यूक्रेनमधील एक व्हिडीओ आता समोर येत आहे. त्यामध्ये रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडलं आहे. यानिमित्तानं यूक्रेन देखील रशियाला आक्रमक पणे उत्तर देत असल्याचं समोर येतंय. रशियानं यूक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर आतापर्यंत रशिया आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाला. रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय. दुसरीकडे परदेशी नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी युद्ध विराम जारी करण्यात आला आहे. या दरम्यान रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामुळं यूक्रेन देखील रशिया ठोस प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.
युक्रेनमधून परतलेल्या MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी!