हा मोठा नेता येणार भारत दौऱ्यावर, जगाच्या लागल्या नजरा
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अनेक मोठ्या देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. या दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत भेटीवर येणार आहेत, अशी माहिती भारतीय वृत्तसंस्था एएनआयने मंगळवारी दिली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री संपूर्ण जगाला माहित आहेत. पंतप्रधान मोदी आणि भारत यांचं अनेकदा कौतूक पुतिन यांच्याकडून होत आहेय. आता दोन्ही नेते लवकरच भेटणार असल्याची शक्यता आहे. मात्र ही भेट कधी होईल हे अद्याप ते निश्चित झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये पुतिन यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या देखील याला दुजोरा दिला आहे. पुतीन यांच्या भारत भेटीच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितलेय.
2022 मध्ये रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले. संपूर्ण जगाने रशियावर निर्बंध लादले. पण भारताने तटस्थ भूमिका घेतली. पंतप्रधान मोदी या युद्धातून मार्ग काढू शकतात असं दोन्ही देशाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 6 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी शेवटचा भारत दौरा केला होता. पुतिन यांच्या भारत दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर भारताने अद्याप अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.
22-23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी रशियाला भेट दिली होती. पुतिन हे देखील भारतात येणार असल्याचं त्यानंतर बोललं जात होतं. भारत भेट आता काही महिन्यांवर आहे. पंतप्रधान मोदी रशियन फेडरेशनच्या अध्यक्षतेखाली कझान येथे झालेल्या 16 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाला गेलेत. पंतप्रधान मोदींनी या वर्षी जुलैमध्ये मॉस्कोलाही भेट दिली होती, 2024 मध्ये त्यांची पहिलीच भेट होती. 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.
“Russian President Vladimir Putin to visit India soon. We are working on the dates,” says Dmitry Peskov, the Kremlin’s press secretary. pic.twitter.com/2TTy6A9UUO
— ANI (@ANI) November 19, 2024
रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. रोम कायद्यानुसार, न्यायालयाच्या स्थापनेच्या करारानुसार, ICC सदस्यांना अटक वॉरंट जारी केलेल्या संशयितांना ताब्यात घेणे बंधनकारक आहे. भारताने रोम कायद्यावर स्वाक्षरी किंवा मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ते भारतात येऊ शकतात.