रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, भारतीय लोकांसाठी मोठी संधी
India-Russia : भारत आणि रशिया यांच्यात गेल्या ७५ वर्षापासून चांगले संबंध आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून चांगली भागीदारी आहे. भारताला जेव्हा जेव्हा गरज पडली रशियाने मदत केली आहे. भारतासाठी रशियाने पुन्हा एकदा मोठी संधी आणली आहे. ज्याचा भारतीय लोकांना मोठा फायदा होणार आहे.
मॉस्को : भारताने अनेक देशांसोबत संबंध चांगले आहेत. मोदी सरकारने यावर गेल्या दहा वर्षात आणखी भर दिला आहे. त्यामुळे अनेक देशांसोबत भारताचे संबंध सुधारले आहेत. यातच आता रशियाने भारताला एक मोठी ऑफर दिली आहे. रशियाने भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीसाठी ऑफर दिली आहे. यामुळे भारतातील बड्या उद्योगपतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मॉस्को शहराचे मंत्री सर्गेई चेरेमिन यांनी बुधवारी सांगितले की, भारत आणि रशियामध्ये उत्तम भागीदारी आहे. भारतीयांना ऑफर देत ते म्हणाले की, भारतीय कंपन्यांसाठी रशियन बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. भारत दौऱ्यावर असलेले चेरेमिन म्हणाले की, अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढला असून दोन्ही देशांच्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक गुंतवणूक सुरू करता येईल.
भारतीय कंपन्यांना ऑफर
चेरेमिन हे मॉस्कोच्या बाह्य अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभाग पाहतात. चेरेमिन यांनी म्हटले की, आम्ही पहिल्यांदाच भारतातील या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. आमचं शहर सर्वात गतिमान शहरांपैकी एक आहोत. आम्हाला युनायटेड स्टेट्स हॅबिटॅटने आधुनिकीकरणासाठी जगातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून मान्यता दिली होती. मॉस्कोतील सर्व म्युनिसिपल सेक्टर्समध्ये डिजिटलायझेशन लागू केले आहे.’
भारत सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, आयटी आणि सायबर सुरक्षा मध्ये खूप प्रगत आहे. मॉस्को आणि नवी दिल्ली आपल्या नागरिकांसाठी यासाठी समन्वय साधू शकतात. दोन्ही देशांमधील संबंध खूप आधीपासून चांगले आहेत. भारतीय कंपन्या मॉस्कोमध्ये गुंतवणूक करु शकतात. कारण रशिया ही एक मोठी बाजारपेठ आहे. असे ही चेरेमिन म्हणाले.
भारत-रशिया संबंधांबाबत प्रशंसा
चेरेमिन पुढे म्हणालेकी, ’75 वर्षांपासून भारत आणि रशिया यांच्यात मोठी भागीदारी आहे. आमच्याकडे स्मार्ट आणि सुरक्षित शहरे आहेत तर तुमच्याकडे उच्च-तंत्रज्ञान यंत्रसामग्री आहे. दोन्ही मिळून द्विपक्षीय व्यापार करण्याची मोठी क्षमता आहे. बहुतेक पाश्चात्य कंपन्या आहेत पण त्यांच्यासोबत आमचे साम्य नाही. रशिया ही एक मोठी बाजारपेठ आहे असून ते युरोपियन बाजारपेठेचे प्रवेशद्वार देखील आहे.’