खलिस्तानी आंतकी पन्नूवर अमेरिका कारवाई का करत नाही? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले कारण

gurpatwant pannu and usa: हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा मुद्दा जस्टिन यांनी मांडला होता. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाजवळ काही माहिती आणि पुरावे असतील तर आम्हाला द्या. आम्ही त्या प्रकरणाचा तपास करु, असे मोदी यांनी म्हटले होते.

खलिस्तानी आंतकी पन्नूवर अमेरिका कारवाई का करत नाही? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले कारण
s jaishankar
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 9:33 AM

नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : अमेरिकेत खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न अमेरिकेत झाला होता. या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पन्नू हा अमेरिकेत राहून सतत भारताच्या विरोधात विधाने करत असतो. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह याची हत्या आणि गुरपतवंत सिंह पन्नू याच्या प्रकरणात परराष्ट्रमंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीत माहिती दिली.

काय म्हणाले जयशंकर

मुलाखतीत जयशंकर यांना G20 लीडर्स समिटमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला. G20 समिटमध्ये नरेंद्र मोदी यांनी कॅनडात सुरु असलेल्या खालिस्तानी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला होता का? त्यावर बोलताना हा मुद्दा उपस्थित केला गेला होता. भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. कॅनडामधून खलिस्तानी समर्थकांना पाठबळ दिले जाऊ नये. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधावर परिणाम होणार आहे.

जस्टिन ट्रूडो यांनी G20 समिटमध्ये खालिस्तानी आतंकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा प्रकरणाबाबत काही प्रश्न उपस्थित केला होता का? त्यावर बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, जस्टिन यांनी हा मुद्दा मांडला होता. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाजवळ काही माहिती आणि पुरावे असतील तर आम्हाला द्या. आम्ही त्या प्रकरणाचा तपास करु, असे मोदी यांनी म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

पन्नूवर अमेरिका कारवाई का करत नाही?

खालिस्तानी आतंकी गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिकामधून भारताविरुद्ध सातत्याने वक्तव्य करत असतो. हा मुद्दा भारताने अमेरिकेसमोर उपस्थित केला होता का? यावर एस.जयशंकर यांनी म्हटले की, खलिस्तानी अतिरेक्यांकडून भारताविरुद्ध होत असलेला प्रचार, हिंसा, दहशतवादी कारवाया हे सर्व मुद्दे अमेरिकेकडे उपस्थित करण्यात आले आहे. पन्नूच्या प्रकरणात अमेरिका ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ असल्याचा दावा करत राहिला आहे. परंतु हा ‘फ्रीडम ऑफ स्पीच’चा दुरुपयोग आहे. मी अमेरिकेला विचारतो, जर तुमच्या विरोधात असे प्रकार झाले तर त्यालाही तुम्ही ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ म्हणाल का? यामुळे या प्रकारला ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ म्हणणे चुकीचे असल्याचे एस.जयशंकर यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.