‘आयुष्य हे खटाखट नाही, इथे तुम्हाला…’, पररराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा
"जो पर्यंत आपण मानवी संसाधन विकसित करणार नाही, तो पर्यंत कठोर मेहनतीची आवश्यकता आहे. जीवन खटाखट नाहीय. जीवनात कठोर मेहनतीची आवश्यकता आहे" असं जयशंकर म्हणाले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ‘आयुष्य हे खटाखट नाहीय. माणसाला कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे’ असं जयशंकर जिनेवा येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलले. “बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मागच्या 10 वर्षात जे विकास कार्य केलय” त्याबद्दल परराष्ट्र मंत्री विस्ताराने बोलले. पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी आवश्यक विशाल मानवी संसाधनांबद्दल एस. जयशंकर बोलले. “जो पर्यंत आपण मानवी संसाधन विकसित करणार नाही, तो पर्यंत कठोर मेहनतीची आवश्यकता आहे. जीवन खटाखट नाहीय. जीवनात कठोर मेहनतीची आवश्यकता आहे” असं जयशंकर म्हणाले.
काँग्रेस सत्तेवर आली, तर महिलांच्या खात्यात खटाखट पैसे जमा होतील असं राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये सातत्याने बोलत होते. त्याच खटाखट शब्दाचा आधार घेऊन परराष्ट्र मंत्र्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
आपण चीनकडून इतकी आयात का करतो?
“काही लोक चीनकडून सामान आयात करण्यावर प्रश्न उपस्थित करतात. आम्ही चीनकडून इतकी आयात का करतो? असा प्रश्न विचारतात. 1960, 70, 80 आणि 90 च्या दशकात सरकारांनी विनिर्माण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगवर अजिबात लक्ष दिलं नाही. आम्ही यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्त्रोत नसल्याच लोकांनी सांगितलं. भक्कम उत्पादनक्षमतेविना तुम्ही प्रमुख वैश्विक शक्ती कसे बनणार? त्यासाठी कठोर मेहनत आणि चांगल्या धोरणांची आवश्यकता आहे. जीवन खटाखट नाहीय. जीवन म्हणजे कठोर मेहनत. आपल्याला कठोर मेहनत करावी लागेल” असं जयशंकर म्हणाले.