कंबर मोडल्यानंतर डोकं आलंं ठिकाण्यावर, मालदीवसाठी भारताकडून मोठी भेट
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. मालदीवच्या दौऱ्यावर असलेले एस जयशंकर मालदीवमधील अनेक मोठ्या भेट दिल्या आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष ही आता भारताला भेट देऊ शकतात. अशी शक्यता आहे.
India maldive row : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीव दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (09 ऑगस्ट) संध्याकाळी ते मालदीवला पोहोचले. मालदीवसाठी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनमुळे भारतासोबतचे संबंध बिघडवले होते. आता या भेटीतून मालदीव भारतासोबत आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल, असे मानले जात आहे. तर मोहम्मद मुइज्जू हे देखील सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येऊ शकतात. याआधी मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. आता एस जयशंकर मालदीवमधील एका मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.
भारत मालदीव संबंध
मालदीवमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे समकक्ष मुसा जमीर यांची भेट घेतली. जयशंकर यांनी मालदीवशी भारताचे असलेल्या संबंधांच्या इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले की आमच्या शेजारी देशांच्या धोरणात मालदीव प्रथम येतो. आमच्या व्हिजन सी तसेच ग्लोबल साउथसाठी आमचे वचन हे महत्त्वाचे आहे. भारतासाठी शेजारी हे नेहमीच प्राधान्य राहिले आहेत. मालदीव आमचा शेजारी आहे. यादरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी सुरक्षा, व्यापार आणि डिजिटल सहकार्यावरही चर्चा केली. मालदीवमध्ये त्यांनी सहा वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. याचा मोठा फायदा मालदीवला होणार आहे.
भारत-मालदीवमध्ये UPI करार
मालदीवमध्ये डिजिटल पेमेंट संदर्भात दोन्ही मंत्रालयांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. त्याचबरोबर 1000 नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा UPI आता परदेशात धमाल करणार आहे. त्यामुळे सरकारही यावर भर देत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या तीन उप मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष यांनी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यांनी भारताला लांब करत चीनसोबत संबंध घट्ट करण्याचा अधिक प्रयत्न केला होता. पण तरी देखील भारताने मालदीवला दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये हात आखडता घेतला नव्हता. पण या घटनेनंतर मात्र भारतीय पर्यटकांनी मालदीवला जोरदार झटका दिला होता. भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली होती. ज्याचा मोठा परिणाम मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. त्यानंतर आता मालदीवकडून भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.