Rajastan Cabinet Reshuffle: आमच्या पक्षात दुफळी नाही, नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली, दलित चेहऱ्यांनाही जागा- सचिन पायलट
रविवारी दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असून त्यात 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. राज्यातील काँग्रेस सरकार पुढील महिन्यात आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण करत आहे. मंत्रिमंडळातील हा पहिला फेरबदल असून, याकडे पक्षश्रेष्ठींचा प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
जयपूर: राजस्थानमध्ये आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. रविवारी सचिन पायलट म्हणाले की, बरीच चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली आहेत आणि जी उणीव आहे ती भरून काढली आहो याचा आनंद आहे. 4 दलित चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. आमच्या सरकारमध्ये दलित समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले आहे. सचिन पायलट यांनी मंत्रिमंडळात बदल झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत पक्षात कोणतेही दोन रट नसल्याचे सांगितले. राजस्थानात शनिवारी मोठे फेरबदल झाले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले. मंत्रिमंडळाचं विस्तारात 11 नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहेत.
Congress is working under leadership of Sonia Gandhi, Rahul Gandhi & Priyanka Gandhi. Party workers will have to work together to bring forth misdeeds of BJP before people. There are no factions in party. The decisions (of cabinet reshuffle) have been taken together: Sachin Pilot pic.twitter.com/w48iOX9nQi
— ANI (@ANI) November 21, 2021
मंत्रिमंडळ विस्तारात प्रियंका गांधींची छाप
पायलट म्हणाले की, आज सकाळी मी वर्तमानपत्र वाचत होतो, या गटाचे इतके मंत्री, या गटाचे इतके मंत्री… आमच्या पक्षात कोणतीही दुफळी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमित मालवीय यांच्या प्रश्नावर पायलट म्हणाले की, यूपीचा मुद्दा तिकीट देण्याचा होता आणि येथे मंत्रिमंडळात 1 ते 3 जागा देण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळात प्रियांका गांधींची छाप दिसून येत आहे. तीन महिलांना मंत्री करण्यात आले आहे. सचिन पायलट म्हणाले की, त्यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची विचारसरणी पुढे आणली असून या विचारसरणीनुसार तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एससी आणि एसटी मंत्रीही करण्यात आले आहेत.
राजस्थानात पंजाब फॉर्म्युला?
रविवारी दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असून त्यात 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. राज्यातील काँग्रेस सरकार पुढील महिन्यात आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण करत आहे. मंत्रिमंडळातील हा पहिला फेरबदल असून, याकडे पक्षश्रेष्ठींचा प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
काँग्रेसने राजस्थानात पंजाबचा फॉर्म्युला वापरल्याचं सांगितलं जात आहे. कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच चार अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जुली आणि गोविंद मेघवाल या चार दलित नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही अपक्ष आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.
इतर बातम्या