गोळ्या झाडल्या जाव्यात, प्रेतांचे खच पडावेत हीच राहुल गांधींची इच्छा: संबित पात्रा
शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिलं (Sambit Patra slams Rahul Gandhi).
मुंबई : शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “रस्त्यावर लढाई व्हावी, गोळ्या झाडल्या जाव्यात, प्रेतांचे खच पडावेत, अशी राहुल गांधींची इच्छा आहे. राहुल गांधी गुंडागर्दी करणाऱ्यांची सुटका करण्याची मागणी करत आहेत. हिंसाचार करणारे राहुल गांधींच्या जवळचे आहेत का?”, असा सवाल संबित पात्रा यांनी केला (Sambit Patra slams Rahul Gandhi).
“गोळी चालावी, शेतकरी आणि पोलीस यांच्यात लढाई व्हावी, प्रेतांचे खच पडावेत, अशी राहुल गांधींची इच्छा होती. मात्र, तसं झालं नाही म्हणून त्यांना त्रास होतोय. काही लोकांनी देशाच्या तिरंगा झेंड्याच्याऐवजी धार्मिक झेंडा चढवला तर तुम्ही ते भाजपचे लोक असून आंदोलक शेतकऱ्यांना बदनाम करत आहेत, असं म्हणत होते. आता त्यांना अटक केली जात आहे तर तुम्ही त्याविरोधात बोलत आहात. याचा अर्थ हे तुमचेच लोक आहेत?”, असा देखील सवाल त्यांनी केला.
“राहुल गांधी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा आरोप त्यांनी केला (Sambit Patra slams Rahul Gandhi).
जगप्रसिद्ध पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय पॉर्नस्टार मिया खलिफानेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यावरही संबित पात्रा यांनी उत्तर दिलं. “राहुल गांधी, रिहाना आणि मिया खलिफा यांना संसद आणि सुप्रीम कोर्टाबाबत काहीही माहिती नाही. राहुल आणि रिहाना यांना काहीच माहिती नाही. दोघांना रब्बी आणि खरीफ हंगाम याच्यातील फरक कळत नाही. जेव्हा कॅलिफोर्नियात महात्मा गांधी यांचा पुतळा तोडण्यात आला तेव्हा रिहाना शांत का राहिली?”, असा सवाल त्यांनी केला.
हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही : राहुल गांधी
“सरकार किल्लाबंदी का करत आहे? ते शेतकऱ्यांना घाबरत आहेत का? शेतकरी शत्रू आहे का? शेतकरी देशाची शक्ती आहे. त्यांना दाबायचं, मारायचं आणि धमकी द्यायचं हे सरकारचं काम नाही. सरकारचं काम शेतकऱ्यांशी बातचित करणं आणि समस्या सोडवण्याचं आहे. हे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या हिताचं नाही”, असं राहुल गांधी आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
संबंधित बातमी :
कुडकुडणाऱ्या थंडीत आमचे जवान तैनात, त्यांना सरकार पैसेही देत नाही, ही कोणती देशभक्ती? : राहुल गांधी