Namo@71: 2035 शिंपले आणि वाळूतून साकारले मोदी, जगप्रसिद्ध सँड आर्टिस्टकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मोदींची ही कलाकृती शेअर केल्यानंतर त्याला नेटकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. शिवाय कमेंट सेक्शनमध्ये लोक, या कलाकृतीची तारीफ करताना पाहायला मिळत आहेत

Namo@71: 2035 शिंपले आणि वाळूतून साकारले मोदी, जगप्रसिद्ध सँड आर्टिस्टकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
पुरी किनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी साकारलेली कलाकृती
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 2:00 PM

पुरी: प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक (Sand artist Sudarsan Pattnaik) यांनी त्यांच्या कलेतून पंतप्रधान मोदींना (Prime Minister Narendra Modi) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पुरीच्या समुद्र किना्रयावर एक मोठी कलाकृती साकारली आहे. समुद्र किनाऱ्यावर त्यांनी एक सँड आर्ड तयार केलं आहे, त्यात मोदींचा फोटो साकारण्यात आला आहे. सुदर्शन पटनायक यांनी हा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Sand artist Sudarshan Patnaik created the sand art of Prime Minister Modi on Puri beach gave birthday wishes to modi)

2035 शिंपल्यांतून साकारले मोदी

ही कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 2035 शिंपल्यांचा वापर करण्यात आला आहे. खुद्ध पटनायक यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन त्याखाली ही माहिती लिहली आहे, ते या पोस्टमध्ये म्हणतात, आपले माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. महाप्रभू जगन्नाथ त्यांना भारतमातेची सेवा करण्यासाठी दीर्घ आयुष्य आणि चांगलं आरोग्य देऊ दे. मी ओडीशाच्या पुरी बीचवर एक सँड आर्ट तयार केला आहे. जे बनवण्यासाठी मला 2035 समुद्री शिंपले लागले.

मोदींच्या कलाकृतीला हजारो लाईक्स

मोदींची ही कलाकृती शेअर केल्यानंतर त्याला नेटकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. शिवाय कमेंट सेक्शनमध्ये लोक, या कलाकृतीची तारीफ करताना पाहायला मिळत आहेत. सुदर्शन हे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सँड आर्ट स्पर्धा जिंकले आहे. जगातील सर्वात उंच सँड कॅसल बनवण्याचा रॅकोर्डही त्यांच्याच नावावर आहे.

सँड आर्टसाठी सुदर्शन यांना पद्मश्री

सुदर्शन पटनायक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सँड आर्टिस्ट आहे. त्यांनी देशाचं नाव परदेशात उंचावलं आहे. त्यांच्या कलेचं जगभरात कौतुक केलं जातं. हेच पाहता 2014 मध्ये सुदर्शन पटनायक यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी कुठेच सँड आर्ट कसं तयार करतात याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. मात्र, आज सुदर्शन सँड आर्ट इन्स्टिट्युट चालवतात, जिथं ते जगभरातील लोकांना सँड आर्ट कसं तयार करायचं हे शिकवतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.