‘पुढची पत्रकार परिषद सेना भवनात, मग थेट ED कार्यालयासमोरच!’ असं राऊतांनी का म्हटलं?

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय एजेन्सी असलेल्या ईडी आणि इतर एजेन्सी या भाजपच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सेंडिमेंटचा भाग आहेत. हा ट्रेलही नाही. ट्रेलर अजून यायचाय. कशा प्रकारे हे क्रिमिनल सेंडिकेट चालवतात, कसं ब्लॅकमेल करतात, कसं मनी लॉड्रिंग करतात हे पुराव्यानिशी दाखवू, असा इशाराच त्यांनी दिला.

'पुढची पत्रकार परिषद सेना भवनात, मग थेट ED कार्यालयासमोरच!' असं राऊतांनी का म्हटलं?
संजय राऊत, खासदार, शिवसेना.
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:23 AM

नवी दिल्लीः आपल्या लेखणीने विरोधकांना सळो की पळो करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नवी दिल्लीमध्ये आपल्या वाकबाणांनी भाजपला (BJP) अक्षरशः घायाळ केले. शिवाय मुंबईमध्ये फक्त शिवसेनाच (Shiv Sena) दादा असेल, हे ऐन महापालिका निवडणुकीपुढे ठणकावून सांगितले. राऊत म्हणाले, ईडीच्या ऑफिसमध्ये कोण लोक बेकायदा जाऊन बसतात? मग जी दोन तीन लोकं जातात, ईडीला ब्रीफ करतात, ईडीला आदेश देतात, कोणाला टॉर्चर करतात, हे सांगतात. मी फडणवीसांना आव्हान करतोय. आणि त्यांना कळलं असणार मला काय सांगायचंय ते. हे सारे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. खोटे पुरावे तयार करतात. कुणीतरी उठतो बेवड्यासारखा बडबडतो आणि कारवाई करतो. त्यामुळे आता मी पुढची पत्रकार परिषद सेना भवनात घेणार. त्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार. हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणार असा इशाराच राऊत यांनी दिलाय.

हे तर आणीबाणी पेक्षाही भयंकर…

संजय राऊत म्हणाले की, सगळ्यात जास्त ईडीचे खटले महाराष्ट्रातच कसे काय? बिहार आणि यूपी, दिल्लीत कसे नाहीत? तर हे सारे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्राचे षडयंत्र सुरू आहे. आणीबाणीत ते तुरुगांत होते. ते जेलमध्ये गेलेत आणि कालच मोदी यांनी राज्यसभेत आणीबाणीतल्या दमनशाहीची आठवण करून दिली. कशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सरकार तर आणीबाणीपेक्षाही भयंकर प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

पुराव्यानिशी दाखवू…

संजय राऊत म्हणाले, त्या लेटरनंतर मला जवळपास सगळ्यांच राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचे फोन आले. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून खोटेनाटे आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचे. ते भ्रमात आहेत. मात्र, आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. राष्ट्रीय एजेन्सी असलेल्या ईडी आणि इतर एजेन्सी या भाजपच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सेंडिमेंटचा भाग आहेत. हा ट्रेलही नाही. ट्रेलर अजून यायचाय. कशा प्रकारे हे क्रिमिनल सेंडिकेट चालवतात, कसं ब्लॅकमेल करतात, कसं मनी लॉड्रिंग करतात हे पुराव्यानिशी दाखवू, असा इशाराच त्यांनी दिला.

इतर बातम्याः

भोगी विषयांचा सोहळा; घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराच्या काट्याची पूजा भांडारात विक्री, राज्यव्यापी कनेक्शन

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.