Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी दिल्लीतच बसलोय, येताय तर या, दिल्लीतही शिवसेना आहे; संजय राऊतांनी ललकारले

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे.

मी दिल्लीतच बसलोय, येताय तर या, दिल्लीतही शिवसेना आहे; संजय राऊतांनी ललकारले
संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 3:21 PM

नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मी दिल्लीतच बसलोय. अधिवेशन संपल्यानंतरही दिल्लीतच राहिल. येताय तर या. मी तुमची वाट पाहतोय, अशा शब्दात संजय राऊत यांनी पोलिसांना आव्हान दिलं.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं. मी काही चुकीचं बोललो नाही. माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही. मी सुशक्षित नागरीक आहे. मला शब्द आणि शब्दांचे अर्थ चांगले समजतात. तक्रारदारापेक्षाही मला त्याचे अर्थ अधिक कळतात. तक्रार समजून न घेता गुन्हा दाखल करणं हे बेकायदेशीर आहे. पोलिसांच्या क्षमतेवर शंका माझी शंका आहे. मी दिल्लीत बसलोय. वाट बघतोय. दिल्लीतही शिवसेना आहे. तुम्हाला बेकायदा कळतो, कायदा कळतो. मी पार्लमेंट संपल्यावरही थांबणार आहे. येताय तर या, असं राऊत म्हणाले.

ही पोलिसी दडपशाही

माझ्याविरोधातील गुन्हा हा बोगस आहे. कायद्याचा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आला आहे. भाजपच्या दबावाखाली केंद्रशासित प्रदेशात फार तर तक्रार होऊ शकेल. पण गुन्हा दाखल करणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही करू शकले नाहीत. त्यामुळे आपल्या अधिकारात असलेल्या केंद्रशासित प्रदेशात गुन्हे दाखल करायचे ही पोलिसी दडपशाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने त्याला उत्तर देऊ, असा इशारा राऊत यांनी दिला.

त्यानुसार त्यांची पावले पडावीत

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण हिंदू असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देशातील हिंदुंच्या भावना डावलून कुणालाही राजकीय दृष्ट्या एक पाऊलही टाकता येणार नाही. याबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली. तरीही त्यांनी जयपूरच्या रॅलीत मी हिंदू आहे आणि काँग्रेसचा आत्माही हिंदू आहे असं सांगितलं. मी त्याचा अर्थ एवढाच घेतला की महात्मा गांधींपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत आणि मदन मोहन मालवियांपर्यंत या साऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मा हिंदू होता. हे त्यांनी मान्य केलं. त्यानुसार त्यांची पावले पडतील अशी आशा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गणितं ठरलेली असतात

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निकालावरही भाष्य केलं. या निवडणुकीचे गणित आणि तंत्र ठरलेलं आहे. त्यानुसार निवडणुका लढतात आणि विजयी होतात, असं ते म्हणाले.

मराठी जनताही जबाबदार

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींवर हल्ला झाला त्याचा फक्त निषेध करायला नको. मराठी बांधवांवर, कार्यकर्त्यांवर हल्ले होतात. दडपशाही होत असते. आपण फक्त निषेधाचे खलिते पाठवतो. काल अजित पवारांनी निषेध केला तेवढ्याने चालणार नाही. दोन मंत्र्यांनी बेळगावला जाऊन समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच कालच्या घटनेला बेळगावची मराठी जनता जबाबदार आहे. महापालिका निवडणुकीत एकजूट दाखवली नाही. भाजपला विजयी केलं. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं बळ वाढलं. त्यातून हल्ले वाढले. हा मराठी माणसाला धडा आहे. एकजूट नसेल तर काय होतं हे कालच्या हल्ल्यातून दिसलं. याबाबत महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray : म्हणावं इतकं काम झालं नाही? भाजपासोबत बोलणी होतेय? राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackeray: निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू; राज ठाकरे यांचा आरोप

Raj Thackeray : महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान

'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले.
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड.
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.