VIDEO: शरद पवारांना खुर्ची दिली, संजय राऊत ट्रोल; राऊत म्हणतात, XXगिरी बंद करा!
शिवसेना नेते संजय राऊत यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देतानाच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून राऊतांना ट्रोल केलं जात आहे.
नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देतानाच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून राऊतांना ट्रोल केलं जात आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही या फोटोवरून राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया दिली. शरद पवारच काय तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती. पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत. आम्ही मांडी घालून बसतो. पवारांना वयोमानामुळे तसं बसता येत नाही. पायाचा त्रास आहे. अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं? हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती. राजकारणात मतभेद असतील तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत. ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर उभेही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
शिवसेनाप्रमुखांनीच संस्कार दिला
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरू आहेत. त्यांनीच मला हा संस्कार दिला आहे. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा. अशाने तुमचं महाराष्ट्रात कधीच राज्य येणार नाही. ही विकृती आहे. तुमच्या डोक्यातील हा कचरा तुम्ही साफ केला नाही तर एखाद्या डंपिंगमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील. हे तुम्हाला मी आता सांगतो. पवारांसारख्या उंचीचे लोकं देशात आहे. त्यांना खुर्ची देणं यात काही वावगं नाही. हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले.
राऊतांचं ट्विट
दरम्यान, राऊतांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपने ही मागणी केलेली असताना राऊतांनी एक व्हिडीओ ट्विट करून Xतिया या शब्दाचा अर्थ सांगितला. आसाममध्ये हे आडनावच असल्याचं या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे.
दुनिया में चुतियोंकी कमी नही एक धूंडो तो हजार मिलेंगे… जरा योगिजी को सूनीये.. pic.twitter.com/jd1R9bFAI8
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2021
प्रियंका गांधींची पुन्हा भेट घेईल
यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसोबत झालेल्या भेटीवरही भाष्य केलं. राहुल गांधी काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. त्यांना मी भेटलो. त्यानंतर प्रियंका गांधी यांनाही भेटलो. काही विषय होते. त्यावर त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावरही या भेटीत चर्चा झाली. महाराष्ट्रात आम्ही एकत्र काम करत आहोत. त्यानुषंगाने ही भेट होती. महाराष्ट्राच्या बाहेर काही काम केलं जाईल का त्यावर चर्चा होते. पण ती चर्चा असते, असं त्यांनी सांगितलं. प्रियंका गांधी आज किंवा उद्या गोव्यात सभा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच प्रियंका गांधींसोबत या पुढेही चर्चा होऊ शकते. त्यांच्याशी भेट होऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Ashish Shelar : महापौर किशोरी पेडणेकरांविषयीचं वक्तव्य भोवलं, आशिष शेलारांवर गुन्हा दाखल