थेट शेंदूर फासलेल्या दगडाशी तुलना, राज ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेनंतर संजय राऊत यांचीही खोचक टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी यावेळी राज यांची शेंदूर फासलेल्या दगडाशी तुलना केली आहे.

थेट शेंदूर फासलेल्या दगडाशी तुलना, राज ठाकरे यांच्या 'त्या' टीकेनंतर संजय राऊत यांचीही खोचक टीका
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 11:16 AM

नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. दोघेही स्वयंभू आहेत. त्यामुळे मी त्यांना काहीच सल्ला देऊ शकत नाही, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राऊत यांनी राज ठाकरे यांची तुलनाच शेंदूर फासलेल्या दगडाशी केली आहे. त्यामुळे आता मनसेकडून राऊत यांना काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

होय, आम्ही स्वयंभू आहोत. जे स्वयंभू दैवत असते त्याच्या मागे जनता जाते. जे शेंदूर फासलेले असतात त्यांच्या मागे कुणी जात नाही. दगडांना शेंदूर फासतात आणि यांनाच देव माना असं सांगतात. त्यांना लोकं वाकून नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या नेत्यांना आणि दैवतांनाच श्रद्धेचा मान मिळतो. तो ठाकरेंना मिळतो. कुणाची पोटदुखी होत असेल तर त्यांनी यावं. आमच्याकडे औषध आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तो विषय देशात गेला पाहिजे

संजय राऊत हे भाजप नेते सत्यपाल मलिक यांना भेटणार आहेत. पुलवामा प्रकरणात ज्या प्रकारचे स्फोट त्यांनी केले ते राजकीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हा विषय मीडियात पोहोचू नये म्हणून दबाव आणला गेला. तो विषय देशात जायला हवा. मलिक महत्त्वाचे नेते आहेत. ते सक्रिय आहेत. पुढील राजकारणात काय मदत होऊ शकेल हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळेच मी सत्यपाल मलिक यांची आज भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

लोक मरायलाही तयार

बारसू रिफायनरी आंदोलनावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकं रस्त्यावर उतरले आहेत. मरायला आणि मारायला तयार आहेत. लोकांना विनाशकारी प्रकल्प नकोय. जमावबंदी तरीही लोकं जमत आहेत. लोकभावनेचा आदर सरकार करत नसेल तर लोकशाहीला अर्थ काय. शिवसेनेच्या आमदारांबद्दल बोलू नंतर. पण आमचे खासदार तिथे आहेत. आम्ही कुठेही हटलो नाही. उद्धव ठाकरे आंदोलकांसोबत आहे. उद्धव ठकारेही तिथे जातील, असं ते म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.