भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा, या मागण्यांचा प्रस्ताव प्रयागराज धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे. संगम नगरी प्रयागराजमध्ये ब्रह्मर्षी आश्रममध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 12:20 PM

लखनऊ: भारताला हिंदू राष्ट्र (hindu rashtra) घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा, या मागण्यांचा प्रस्ताव प्रयागराज धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे. संगम नगरी प्रयागराजमध्ये (prayagraj) ब्रह्मर्षी आश्रममध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या धर्म संसदेत (dharma sansad) देशभरातून शेकडो साधू संत सहभागी झाले होते. यावेळी सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे आजपासूनच लिहायला सुरुवात करा. आजपासूनच ही चळवळ सुरू करा, म्हणजे भविष्यात हे आंदोलन मोठं होईल आणि जनतेच्या दबावाखाली सरकारला एक ना एक दिवस झुकावेच लागेल, असं आवाहन या संमेलनात करण्यात आलं. या आव्हानाला सर्व साधू-संतांनी शंखनाद करून आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यामुळे देशभरात भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची चळवळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सव्वा कोटी जनतेने स्वत: भारताला हिंदू राष्ट्र म्हटलं पाहिजे. तसं लिहिण्यास सुरुवात केली पाहिजे. तरच आपलं आंदोलन मोठं होईल. या आंदोलनामुळे सरकारला अखेरीस झुकावेच लागेल. कारण संत संमेलनाचा उद्देशच भारताला हिंदू राष्ट्र बनवणे आहे. तसेच इस्लामिक जिहाद दूर करणे आहे, असं या संतांनी सांगितलं.

दोन धर्म गुरूंना तुरुंगातून सोडा

यावेळी भारतातील सर्व मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचा मागणीही करण्यात आली. हिंदूच्या मठ आणि मंदिरांचं अधिग्रहण संपुष्टात आणणे आदी प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आले. तुरुंगात बंद असलेले धर्म गुरू नरसिंहानंद गिरी महाराज आणि वसीम रिझवी ऊर्फ नारायण सिंह त्यागी यांना तुरुंगातून लवकरात लवकर सोडण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोणत्याही अटीशिवाय या दोन्ही धर्म गुरूंची सुटका करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलं. जिल्हा प्रशासनाने संतांना फोन करून संमेलनात सहभागी होण्यापासून रोखले तसेच त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आणले, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

म्हणून नाव बदललं

दरम्यान, प्रयागराज प्रशासनाच्या दबावानंतर धर्म संसदेचं नाव बदलून संत संमेलन करण्यात आलं आहे. धर्म संसद भरवण्यास प्रशासनाने नकार दिला होता. त्यामुळे त्याचं नाव बदलून संत संमेलन करण्यात आलं.

संबंधित बातम्या:

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार झाहिद वाणीसह पाच अतिरेक्यांचा खात्मा, जम्मू काश्मीर पोलिसांना मोठं यश

‘मागे व्हा, तुम्ही ब्राम्हण नाही!’ असं म्हटल्यानंतर गांधींनी टिळकांच्या अंत्ययात्रेत नेमकं काय केलं?

Supreme Court : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना चाप बसणार; सुप्रीम कोर्ट तातडीने सुनावणी घेण्याच्या तयारीत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.