Mohammad Iqbal : ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताचे कवी अभ्यासक्रमाबाहेर! फाळणीशी त्यांचा असा संबंध

Mohammad Iqbal : 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' या गीताचे कवी अभ्यासक्रमाबाहेर गेले आहेत. याविषयीचा निर्णय नुकताच घेण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताने क्रांतीकारकच नाही तर सर्वसामान्य जनतेला लढण्यासाठी प्रेरणा दिली होती.

Mohammad Iqbal : 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' या गीताचे कवी अभ्यासक्रमाबाहेर! फाळणीशी त्यांचा असा संबंध
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 6:00 PM

नवी दिल्ली : ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताचे कवी अभ्यासक्रमाबाहेर गेले आहेत. याविषयीचा निर्णय नुकताच घेण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताने क्रांतीकारकच नाही तर सर्वसामान्य जनतेला लढण्यासाठी प्रेरणा दिली होती. कवी मोहम्मद इकबाल (Muhammad Iqbal) यांच्या लेखणीतून उतरलेल्या या देशभक्ती गीताने अनेक क्रांतीकारकांना जन्म दिला. अनेकांना लढण्याचे बळ दिले. आजही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी हे गीत लागताच अंगावर शहारे येतात. ऊर अभिमानाने भरुन येतो. छाती 56 इंचाची होती. या देशात जन्म झाल्याच्या कौतुकाने अंग रोमांचित होतं. पण काळाचा महिमा असतो, तो नाकारुन चालत नाही.

कुठे झाला हा निर्णय दिल्ली विश्वविद्यालयात हा निर्णय घेण्यात आला. आता कवी मोहम्मद इकबाल पाकिस्तानचे राष्ट्रकवी आहेत. फाळणीपूर्वीच ते पाकिस्तानच्या बाजूने होते. त्यांनी मोहम्मद अली जिना यांच्या सोबत स्वतंत्र पाकिस्तानसाठी हुंकार भरला होता. इतिहास तज्ज्ञानुसार, मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची संकल्पना मुळात जिना नाही तर मोहम्मद इकबाल यांचीच होती. त्यांनी पाकिस्तानसाठी राष्ट्रीय गीत लिहिले. पण त्याला ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताची सर आली नाही. याची खंत या कवीला पण होती.

देश तोडणारा कशाला हवा अभ्यासक्रमात दिल्ली विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक परिषदेने अभ्यासक्रमातून त्यांचा धडा हटविण्याचा निर्णय घेतला. कवी मोहम्मद इकबाल यांच्या विचाराचा एक धडा अभ्यासक्रमात होता. BA च्या सहाव्या सत्रात हा धडा होता. मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट्स या नावाने हा इकबाल यांचा धडा होता. तो यावेळी हटविण्यात आला. मज़हब नहीं सिखाता, आपस में बैर रखना असा संदेश देणारे कवी नंतर धर्मासाठी राष्ट्र हवे म्हणून हट्टाला पेटले.  अर्थात ज्याने भारत तोडण्याची भाषाच नाही तर कृती केली, त्या कवीला आपल्या अभ्यासक्रमात कशाला स्थान द्यायची अशी भूमिका होती. तसेच इतर ही अनेक बदल आणि निर्णय शैक्षणिक परिषदेने घेतले.

हे सुद्धा वाचा

सारे जहाँ से अच्छा चे गारुड आता तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सारे जहाँ से अच्छा हे आता आपण अनौपचारिकरित्या राष्ट्रीय गीत मानतो. पण खरंतर ही राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भरलेली एक गझल आहे. ऊर्दुतील मिठास या गझलेला लाभलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात या गीताने मोठा इतिहास रचला. शायर मोहम्मद इकबाल यांनी 1905 साली ही गझल लिहून पूर्ण केली होती. त्यांच्या बंग-ए-दारामध्ये तिचा समावेश आहे. लाहोर येथील महाविद्यालयात त्यांना भाषण देण्यासाठी बोलविण्यात आले होते. लाला हरदयाल हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी भाषण देण्याऐवजी ही गझल ऐकवली होती. पण पाकिस्तान निर्मितीसाठी त्यांनी आणि जिनांनी जे विखार ओतले, त्यामुळे देशात दंगली भडकल्या. त्या अत्याचाराच्या जखमा आजही भरलेल्या नाहीत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.