AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Mla Suspension: महाविकास आघाडीला कोर्टाची सणसणीत चपराक, सत्यमेव जयते!; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्य सरकारने विधासभा अधिवेशनात भाजपच्या 12 सदस्यांना निलंबित केलं होतं. या सर्व आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. या निर्णयाचं भाजपने जोरदार स्वागत केलं आहे.

Maharashtra Mla Suspension: महाविकास आघाडीला कोर्टाची सणसणीत चपराक, सत्यमेव जयते!; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पंडितजींनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली-फडवीस
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 12:11 PM

पणजी: राज्य सरकारने विधासभा अधिवेशनात भाजपच्या 12 सदस्यांना निलंबित केलं होतं. या सर्व आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. या निर्णयाचं भाजपने (bjp)जोरदार स्वागत केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. त्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. फडणवीस यांनी सत्यमेव जयते म्हणत कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) निर्णयाने महाविकास आघाडील सणसणीत चपराक बसली आहे. राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर होता. संविधानाला धरून नव्हता, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं आहे. दरम्यान, फडणवीस आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर अधिक सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सत्यमेव जयते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात आमच्या आमदारांनी आवाज उठवला. त्यावेळी या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि कोर्टाचे आभार मानतो. कोर्टाचा हा निर्णय लोकशाही मूल्य वाचवणारा असून दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीला सणसणीत चपराक लगावणारा आहे. या सरकारने घेतलेला हा निर्णय असंवैधानिक होता. नैतिकमूल्यांना धरून नव्हता. निरपेक्ष नव्हता. हा निर्णय बेकायदेशीर होता, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

निर्णयामागे लॉजिक नव्हतं

न्याय मिळाल्याबद्दल भाजपच्या सर्व आमदारांचं फडणवीस यांनी अभिनंदनही केलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं मी आधीपासून सांगत होतो. हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं मी नमूद केलं होतं. कृत्रिम संख्याबळाच्या जोरावर सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयामागे कोणतंही महत्त्वाचं कारण नव्हतं. म्हणूनच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं आणि आमच्या बाजूने निकाल दिला, असंही त्यांनी म्हटलं आहे. हा केवळ 12 आमदारांचा प्रश्न नव्हता तर 12 मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक नागरिकांचा प्रश्न होता, असं सांगतानाच सेव्ह डेमोक्रसी असंही त्यांनी म्हटलं आहे.

निलंबित आमदार कोणते?

1 अतुल भातखळकर 2 राम सातपुते 3 आशिष शेलार 4 संजय कुटे 5 योगेश सागर 6 किर्तीकुमार बागडिया 7 गिरीश महाजन 8 जयकुमार रावल 9 अभिमन्यू पवार 10 पराग अळवणी 11 नारायण कुचे 12 हरीश पिंपळे

संबंधित बातम्या:

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारला दणका

12 आमदारांचं निलबंन रद्द करताना सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं? आशीष शेलारांनी सांगितलं!

BJP MLA: तीन चाकांच्या सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं, निलंबन रद्द झालेल्या आमदारांचा इशारा!

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.