Constable Story: आयएएस बनवण्याचे स्वप्न, वडिलांच्या मृत्यूनंतर सोडली UPSC ची तयारी, कॉन्टेबल बनल्यावर कोट्यवधींचा खेळ
Former RTO Constable, Saurabh Sharma Story: सचिन आणि सौरभ दोन्ही भाऊ दिल्लीत यूपीएससीची तयारी करु लागले. परंतु सौरभ यूपीएससी किंवा पीसीएस (मध्य प्रदेश सरकारची परीक्षा) क्रॅक करु शकला नाही. दुसरीकडे सचिनने छत्तीसगड लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केला.
Former RTO Constable, Saurabh Sharma Story: मध्य प्रदेशातील सौरभ शर्मा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आरटीओमध्ये कधीकाळी कॉन्टेबल राहिलेल्या सौरभ शर्माकडे कोट्यवधींचे दागिने आणि रोकड मिळाली आहे. त्याची काळी कमाई पाहून आयकर विभाग, लोकायुक्त, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्याचा तपास करत आहे. सौरभ शर्माचे आयएएस बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली होती. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सोडली. त्यानंतर परिवहन विभागात अनुकंपा तत्वावर कॉन्स्टेबल बनला. मग कोट्यवधी रुपयांची कामाई केली.
परिवहन विभागात कॉन्टेबल राहिलेला सौरभ शर्मा हा मध्य प्रदेशातील मुरैना येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील ग्वालियरच्या कारागृहात आरोग्य अधिकारी होते. त्यामुळे त्याचा परिवार ग्वालियरमध्येच राहत होता. सौरभचे शिक्षण ग्वालियरमध्ये झाले. शिक्षण सुरु असताना त्याने आयएएस बनवण्याचे स्वप्न पाहिले. त्यामुळे कॉलेजची पदवी मिळाल्यावर त्याने संघ लोक सेवा आयोग (UPSC) परीक्षेची तयारी सुरु केली. तो त्याचा मोठा भाऊ सचिनसोबत यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला.
आयएएस ऐवजी बनला कॉन्सटेबल
सचिन आणि सौरभ दोन्ही भाऊ दिल्लीत यूपीएससीची तयारी करु लागले. परंतु सौरभ यूपीएससी किंवा पीसीएस (मध्य प्रदेश सरकारची परीक्षा) क्रॅक करु शकला नाही. दुसरीकडे सचिनने छत्तीसगड लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केला. त्यानंतरही सौरभची यूपीएससी तयारी सुरु होती. 2015 मध्ये सौरभच्या वडिलांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. यामुळे सौरभ याने यूपीएससीची तयारी सोडली. वडिलांच्या जागेवर तो राज्य परिवहन विभागात अनुकंपा तत्वावर कॉन्सटेबल झाला. सौरभची आई उमा शर्मा राजकारणात सक्रीय होती. त्यांच्या माहेरचे तीन जण डीएसपी आहेत.
मध्य प्रदेश लोकायुक्तांनी सौरभ शर्माच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरी 234 किलो चांदी, 10 कोटींची रोकड, 52 किलो सोने मिळाले. आता या प्रकणाची चौकशी डीआरआय (DRI), इनकम टॅक्स (Income Tax), ईडी (ED) आणि लोकायुक्तकडून चौकशी सुरु आहे.