Jai Shri Ram | शाळेच्या बसमध्ये ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय श्री राम’ बोलणं मुलीला महाग पडलं, शिक्षकाला नाही पटलं, मग…
Jai Shri Ram | मुलीच्या वडिलांनी एसपीकडे तक्रार केली. महिला पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. शाळा व्यवस्थापनाची यामध्ये काय भूमिका आहे? शाळेचे संचालक 3-4 दिवसापासून सुट्टीवर होते.
नवी दिल्ली : शाळेत जय श्री राम बोलणं एका मुलीला चांगलच महाग पडलं. शाळेतल्या शिक्षकाने या मुलीला थेट शिक्षा दिली. मुलीने या बद्दल आपल्या कुटुंबीयांना सांगितलं. विद्यार्थीनीच्या वडिलांनी शाळेमध्ये याची तक्रार केली. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने त्यांना शाळेत जय श्री राम बोलता येणार नाही, असं सांगितलं. विद्यार्थीला ओरडा पडला. त्यानंतर शिक्षकाने संपूर्ण वर्गासमोर तिला हात वर करुन उभ केलं. राजस्थानच्या सवाई माधोपुरमधील ही घटना आहे.
मुलीच्या वडिलांनी एसपीकडे तक्रार केली. महिला पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. तक्रार केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने काही कारवाई केली नाही, असं मुलीच्या वडिलांच म्हणण आहे. त्यांना शाळेत जय श्री राम बोलता येणार नाही, असं सांगितलं. मुलीला शाळेत सर्वांसमोर शिक्षा दिली. त्यांनी पोलिसांकडे न्याय मागितला आहे.
काय शिक्षा दिली?
मुलीचे वडील मुकेश योगी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. मुलगी चंचल योगी राधाकृष्णन स्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकते. चार-पाच दिवसांपूर्वी मुकेश हे चंचलला सोडण्यासाठी शाळेच्या बसजवळ गेले होते. त्यावेळी मुलीने त्यांना जय श्रीराम म्हटलं. ज्यावर नाराज होऊन कंडक्टर महावीर आणि टीचर तिला ओरडले. शाळेत पोहोचल्यावर मुलीला शिक्षा म्हणून हातवर करुन उभं केलं.
शाळेच्या प्रिंसिपल काय म्हणाल्या?
घरी आल्यानंतर मुलीने सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांच्या कानावर घातला. माहिती मिळताच, मुकेश योगी दुसऱ्यादिवशी शाळेत पोहोचले. पण शाळेचे संचालक 3-4 दिवसापासून सुट्टीवर होते. चार दिवसानंतर मुकेश शाळेत गेले व संचालकांना सगळा प्रकार सांगितला. त्यावेळी प्रिंसिपल ममता माहेश्वरी यांनी त्यांना सांगितलं की, शाळेत मुलीला शिकवायच असेल, तर गुड मॉर्निंगच बोलाव लागेल.