NOTAला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द करा; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

उमदेवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (SC notice to Centre, EC on plea to nullify election result if NOTA gets maximum votes)

NOTAला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द करा; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्ट
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 1:44 PM

नवी दिल्ली: उमदेवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. (SC notice to Centre, EC on plea to nullify election result if NOTA gets maximum votes)

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाकडे भाजप नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाल्यास त्या मतदारसंघातील निवडणुका रद्द कराव्यात. त्यानंतर या मतदारसंघात नव्याने निवडणुका घ्याव्यात आणि रद्द झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांना नव्याने होत असलेल्या निवडणुकीत भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच सहा महिन्याच्या आत या निवडणुका घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याचा अर्थ मतदार असंतुष्ट आहे

बऱ्याचदा राजकीय उमेदवार मतदारांशी चर्चा न करताच उमेदवारांची निवड करतात. त्यामुळे राजकीय पक्षांनी दिलेल्या उमदेवारांवर अनेकदा मतदार नाराज असतात. त्यामुळे नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर त्या ठिकाणी पुन्हा मतदान घेऊनच ही समस्या सोडवली पाहिजे. नोटाला सर्वाधिक मते मिळणे याचा अर्थच मतदार उमेदवारांवर असंतुष्ट आहेत असा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, असं याचिकेत म्हटलं आहे.

सरन्यायाधीशांचा सवाल

दरम्यान, सरन्यायाधीशांनी या मागणीवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. ही मागणी मान्य केल्यास अशा परिस्थितीत त्या जागेवर कुणाचंच प्रतिनिधीत्व राहणार नाही. मग सभागृहाचं काम कसं चालणार?, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला आहे. ही याचिका वकील अश्विनी उपाध्याय यांनी केली आहे. सीनियर वकील मेनका गुरुस्वामी या युक्तीवाद करण्यासाठी कोर्टात हजर होत्या. (SC notice to Centre, EC on plea to nullify election result if NOTA gets maximum votes)

संबंधित बातम्या:

निवडणुका आहेत भूमिका घेऊ शकत नाही; आरक्षण मर्यादेवर तामिळनाडू, केरळाचं सुप्रीम कोर्टाला उत्तर

VIDEO: दलित कार्यकर्त्याच्या घरी भोजनावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य समर्थक भिडले

भाजप खासदाराच्या घराबाहेर सुनेने हाताची नस कापली; मुलावर गंभीर आरोप

(SC notice to Centre, EC on plea to nullify election result if NOTA gets maximum votes)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.